बदलापुरात काय चाललंय? आई-वडिलांनीच केली 5 दिवसांच्या मुलाची विक्री!

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर हे शहर सध्या चुकीच्या कारणांमुळेच चर्चेत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो
बदलापूर:

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर हे शहर सध्या चुकीच्या कारणांमुळेच चर्चेत आहे. बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. या प्रकरणाचे संपूर्ण राज्यभर पडसाद उमटले. हे प्रकरण ताजं असतानाच  अवैध मुल तस्करीचा एक धक्कादायक प्रकार बदलापूरमध्ये उघड झाला आहे. येथील जोडप्यानं त्यांचं 5 दिवसांचं मुल 1 लाखांना विक्री केली. त्यांनी मुल नसलेल्या एका जोडप्याला पोटच्या मुलाची विक्री केली. या जोडप्याला मुल दत्तक हवं होतं. पण, त्यांनी दत्तक घेण्याची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता मुलाची खरेदी केली. नागपूर पोलिसांनी या प्रकरणात 6 जणांना अटक केली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील उर्फ भोंदू दयाराम गेंद्रे  (31) आणि त्याची पत्नी श्वेता (27) यांनी त्यांचं मुल पोर्णिमा शेळके (32) आणि स्नेहदीप धरमदास शेळके (45) यांना विकलं. हे ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरचे रहिवाशी आहेत. किरण इंगळे (41) आणि तिचा नवरा प्रमोद इंगळे (45) या मध्यस्थांच्या मार्फत हा व्यवहार झाला. किरण आणि प्रमोद हे दोघं नागपूरचे रहिवाशी आहेत. या सर्वांना अटक करण्यात आलीय. 

Advertisement

सुनील आणि श्वेता गेंद्रे यांनी त्यांचं मुल शेळके दाम्पत्याला किरण आणि प्रमोद इंगळेच्या मदतीनं 22 ऑगस्ट रोजी विकलं होतं. शेळके दाम्पत्य हे इंगळेचे नातेवाईक आहेत. त्यांनी या कामासाठी 1 लाख रुपये दिले. तसंच कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता मुलाला सोबत घेऊन गेले. 

Advertisement

( नक्की वाचा : जन्माष्टमी पाहण्यासाठी गेल्या होत्या 2 मुली, झाडाला लटकलेला मृतदेहच सापडला )
 

मानव तस्करी विरोधी पथकाला (AHTS) याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली आहे. सर्व जणांवर जुवेनाइल जस्टिस (केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड) अंतर्गत कलम 75 आणि कलम 81 नुसार नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. लहान मुलाला तात्पुरतं अनाथालयात ठेवलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.  

Advertisement
Topics mentioned in this article