Pakistani Spy Arrested :ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या गद्दारांना शोधण्याची मोहीम सुरक्षा यंत्रणांनी सुरु केली आहे. या कारवाईत आत्तापर्यंत वेगवेगळ्या राज्यातील हेर ताब्यात घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रात देखील यासंदर्भात कारवाई करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यातील कळवा येथून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. रवी कुमार वर्मा (Pakistani Spy Ravi Varma) असे या आरोपीचे नाव आहे. नेमका रवी हा या सगळ्यामध्ये कसा फसला हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कसा अडला पाकिस्तानच्या जाळ्यात?
रवी हा नेव्हल डॉकमध्ये फिटर म्हणून कामाला होता. तो वर्षभरापासून फेसबुकच्या माध्यमातून एका महिलेच्या संपर्कात होता. ती मुलगी व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अंगप्रदर्शन करत होती. रवी तिच्या सौंदर्यावर भुलला आणि हनी ट्रॅप मध्ये अडकला. गेल्या दोन महिन्यापासून एटीएसने रविकुमार वर्मा याच्या बारीक हालचालींवर लक्ष ठेवले होते.
रवी नेवल डॉक मध्ये फिटर म्हणून कामाला असल्याने त्याला संपूर्ण परिसराची माहिती होती. या व्यतिरिक्त तो केरळ, कोची आणि अलिबाग येथे देखील कामानिमित होता. त्यानं या भागातील काही गोपनीय माहिती पाकिस्तानी मुलीला दिली होती.
( नक्की वाचा : ज्योती मल्होत्राचा थेट होता ISI शी संपर्क, पाकिस्तानात AK 47 घेऊन... नव्या Video मधून अनेक रहस्य उघड )
आईने मुलगी शोधली होती
रवीला आपल्याबाबतीत काही तरी चुकीचं घडत असल्याचं लक्षात आलं होतं. त्यानं ती माहिती त्याची आई रेखा वर्मा यांना दिली. त्यानं लग्न लावून देण्यासाठी आईला सांगितलं. आईने त्याच्यासाठी मुलगी देखील शोधली. पण, आता हे सर्व घडल्यानंतर माझ्या मुलाचं लग्न मोडलं आहे, असं रेखा वर्मा यांनी सांगितलं.
तपासात काय आढळले?
रवी वर्माची आज (30 मे) पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली. आत्तापर्यंतच्या तपासात असे आढळून आले की आरोपीने नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 दरम्यान व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत एका मोठ्या संघटनेची संवेदनशील माहिती शेअर केली होती.
रवी पाकिस्तानमधील दोन फेसबुक अकाऊंटच्या संपर्कात होता. पायल शर्मा आणि इस्प्रीत या नावांची ही पाकिस्तानी खाती आहेत. रवीनं तब्बल 14 पाणबुड्या आणि युद्धनौकांची माहिती या फेसबुक खात्यांना पाठवली होती. युद्धनौका तसेच इतर जहाजाची माहिती आणि चित्रही बनवून पाकिस्तानला पाठवली. तो नोव्हेंबर 2024 पासून त्यांच्या संपर्कात होता.
नेव्हल डॉकमधल्या परिसरात मोबाईल नेण्यास बंदी असल्याने आरोपी रवी युद्धनौकांचे स्ट्रक्चर आणि इतर माहिती लक्षात ठेवत असे. त्यानंतर तो पायल शर्मा आणि इस्प्रीत या अकाउंटला पाठवायत असे. रवी ही सर्व माहिती ऑडियो आणि टेक्स्ट स्वरूपात तसेच चित्र काढून पाठवायचा असेही तपासात आढळले आहे.
पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हची फेसबुक अकाऊंट असलेल्या पायल शर्मा आणि इस्प्रित या खात्यावरून एका प्रोजेक्टसाठी युद्धनौकांची माहिती हवी आहे, अशी मागणी रवी वर्माकडे होत होती. हनी ट्रॅपमध्ये अडकलेला रवी वर्मा ही माहिती पायल शर्मा आणि इस्प्रितला वारंवार पाठवत होता, असे तपासात आढलले आहे.