Trending News: 5 तास पाण्यात लपला, कमळाच्या देठाने श्वास घेत राहीला, पण शेवटी फिल्मी स्टाईल एन्ड

हरविंदर हा विनातिकीट ट्रेनमध्ये प्रवास करून महिला आणि वृद्ध प्रवाशांना लक्ष्य करायचा.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • जबलपूर विभागातील सिहोरा रेल्वे स्थानकावर आरपीएफने एका कुख्यात आंतरराज्य चोरट्याला पकडले
  • हरविंदर सिंग नावाचा चोरटा पाच तास तलावात पाण्याखाली कमळाच्या देठाद्वारे श्वास घेत पोलिसांना चकवा देत होता
  • आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ओळख लपवली होती, पण आरपीएफने आयसीजेएस रेकॉर्ड तपासून त्याचा खरा शोध लावला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) एका सराईत आंतरराज्य चोरट्याला पकडण्यासाठी राबवलेली मोहीम एखाद्या लष्करी सर्व्हायव्हल ड्रिलसारखी थरारक ठरली. जबलपूर विभागातील सिहोरा रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. महिला प्रवाशाची पर्स चोरून पळणाऱ्या हरविंदर सिंग (32) याने पोलिसांना चकवा देण्यासाठी भन्नाट आयडीया केली. तो चक्क पाच तास शेवाळलेल्या तलावात पाण्याखाली राहीला. ऐवढच नाही तर श्वास घेण्यासाठी नामी शक्कल ही लढवली. त्याने त्यासाठी कमळाच्या देठाचा वापर केला. त्या द्वारे तो श्वास घेत राहीला. पाच तास त्याने पोलीसांनां अशा प्रकारे चकवा दिला. पण या पाठलागाचा फिल्मी स्टाईल शेवट झाला.

6 एप्रिल रोजी पहाटे 4.50 च्या सुमारास ट्रेन क्रमांक 11753 मधून उतरलेल्या एका संशयिताला आरपीएफने अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाहताच या चोरट्याने जवळच असलेल्या एका तलावात उडी घेतली. पकडले जाऊ नये म्हणून त्याने श्वास घेण्यासाठी कमळाच्या पोकळ देठाचा वापर केला. तब्बल 5 तास तो पोलिसांना दिसला नाही. मात्र आरपीएफने स्थानिक पोलीस आणि डायव्हर्सच्या मदतीने शोध सुरूच ठेवला. अखेर त्याला बाहेर काढण्यात आले.

Advertisement

नक्की वाचा - Sharad Pawar: अशोक खरातबाबतचा प्रश्न अन् शरद पवारांनी सांगितली आतली गोष्ट, सर्वांच्याच भुवया उंचावल्या

सुरुवातीला आरोपीने आपली ओळख लपवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरपीएफ जवानांनी एका जुन्या बातमीचा संदर्भ आणि ICJS रेकॉर्ड तपासले. ते तपासल्यानंतर हा चोरटा उत्तर प्रदेशातील बिजनौरचा कुख्यात गुन्हेगार हरविंदर सिंग असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील विविध पोलीस ठाण्यांत चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलीसांचा संशय पक्का झाला. हाच तो चोर असल्याची पोलीसांची खात्री झाली. त्यानंतर सुरू झाला तो हरविंदर सिंग याला पकडण्याचा थरार. 

नक्की वाचा - Pune News: नशेत अनेक गाड्यांना ठोकले, मग पोलीसाच्या अपहरणाचा प्रयत्न, नंतर भर रस्त्यात चोप

हरविंदर हा विनातिकीट ट्रेनमध्ये प्रवास करून महिला आणि वृद्ध प्रवाशांना लक्ष्य करायचा. तो स्वतःजवळ कधीही ओळखपत्र ठेवत नव्हता. तो पोलिसांना गुंगारा देण्यासाठी वारंवार सिम कार्ड बदलत होता. इगतपुरी, भोपाळ, इटारसी आणि विशाखापट्टणम यांसारख्या अनेक ठिकाणच्या रेल्वे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी केले होते. जबलपूर आरपीएफने आता त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. पण तो सहजासहजी पोलीसांच्या हाती लागला नाही. शेवटपर्यंत त्याने पोलीसांना तंगवले. पोलीसांनी ही हार मानली नाही. त्यांनी शेवटी त्याला पकडला. एक मोस्ट वाँटेड गुन्हेगार पोलीसांच्या जाळ्यात अडकला.