अल्पवयीन मुलीला Grooming Gang चा विळखा, घरात कोंडलं, पण 200 जणांनी एकत्र येत केली थरारक सुटका, पाहा VIDEO

UK Grooming Gang Horror: एका 16 वर्षांच्या मुलीला एका नराधमाने आपल्या घरात डांबून ठेवले होते. तिला जाळ्यात ओढण्यासाठी त्याने तब्बल 3 वर्षांपासून सापळा रचला होता.

जाहिरात
Read Time: 3 mins
Pakistani Grooming Gang UK : पीडित मुलगी जेव्हा अवघ्या 13 वर्षांची होती, तेव्हापासून आरोपीने तिच्याशी मैत्री वाढवली होती.
मुंबई:

UK Grooming Gang Horror: एका 16 वर्षांच्या मुलीला एका नराधमाने आपल्या घरात डांबून ठेवले होते. तिला जाळ्यात ओढण्यासाठी त्याने तब्बल 3 वर्षांपासून सापळा रचला होता. जेव्हा ही बातमी पसरली, तेव्हा न्याय मिळवून देण्यासाठी 200 शूरवीरांनी एकत्र येत त्या घराला वेढा घातला. 'जो बोले सो निहाल, सत श्री अकाल'च्या घोषणांनी तो संपूर्ण परिसर दणाणून गेला आणि अखेर नराधमांच्या तावडीतून त्या मुलीची सुटका करण्यात आली.

कुठे घडला हा प्रकार?

ही खळबळजनक घटना ब्रिटनमधील लंडन शहरात असलेल्या हाऊन्सलो भागात घडली आहे. येथील एका 30 ते 40 वयोगटातील व्यक्तीने एका 16 वर्षांच्या तरुणीला आपल्या घरात कैद करून ठेवले होते. 

या तरुणीवर पाकिस्तानी ग्रुमिंग गँगच्या 6 इतर सदस्यांनी बलात्कार केल्याचा अत्यंत गंभीर आरोप आहे. शिख समुदायातील 200 तरुणांनी एकत्र येऊन केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांना कारवाई करणे भाग पडले आणि मुख्य आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या.

( नक्की वाचा : BMC Election : मुंबईत 30,000 रुपयांत मिळतंय भारतीय नागरिकत्व? NDTV च्या रिपोर्टमधून 'मालवणी पॅटर्न'चा खुलासा )

मैत्रीचे नाटक आणि 3 वर्षांचा कट

पीडित मुलगी जेव्हा अवघ्या 13 वर्षांची होती, तेव्हापासून आरोपीने तिच्याशी मैत्री वाढवली होती. ग्रुमिंगच्या तंत्राचा वापर करून त्याने तिला जाळ्यात ओढले आणि ती 16 वर्षांची झाल्यावर तिला घर सोडायला लावले. ज्या घरात तिला डांबले होते, त्या परिसरात 20 माध्यमिक शाळा आहेत. 

Advertisement

अनेक लहान मुले तिथून रोज ये-जा करतात, त्यामुळे या घटनेने स्थानिक पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारवाईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्यात पोलीस आरोपीला व्हॅनमध्ये घालून नेताना दिसत आहेत.

ब्रिटनमधील ग्रुमिंग गँगचा काळा इतिहास

युकेमधील पाकिस्तानी ग्रुमिंग गँग गेल्या अनेक दशकांपासून अशा पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे समोर आले आहे. या टोळ्या प्रामुख्याने 11 ते 16 वयोगटातील मुलींना लक्ष्य करतात. त्यांना प्रेमाचे आमिष दाखवणे, महागड्या भेटवस्तू देणे आणि मैत्रीच्या बहाण्याने कुटुंबापासून दूर करणे ही यांची कामाची पद्धत आहे. एकदा का मुलगी जाळ्यात अडकली की तिला ब्लॅकमेल केले जाते आणि पैशांसाठी तिची मानवी तस्करी केली जाते.

Advertisement

एलोन मस्क यांनीही दिला होता इशारा

या प्रकरणाची व्याप्ती इतकी मोठी आहे की जागतिक स्तरावर याची चर्चा होत आहे. उद्योगपती एलोन मस्क यांनीही गेल्या वर्षी या विषयावर संताप व्यक्त केला होता. खासदार रुपर्ट लोवे यांनी जेव्हा या गँग्सविरुद्ध राष्ट्रीय चौकशीची मागणी केली होती, तेव्हा मस्क यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. 

अत्याचार सहन केलेल्या आणि जीव गमावलेल्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी कडक पावले उचललीच पाहिजेत, असे मत मस्क यांनी सोशल मीडियावरून मांडले होते.

Advertisement

द गार्डियनच्या एका रिपोर्टनुसार, ब्रिटनमधील बाल लैंगिक शोषणाची ही समस्या खूप खोलवर रुजलेली आहे. रॉदरहॅममध्ये 1997 ते 2013 या कालावधीत किमान 1400 मुलांवर अशाच प्रकारे अत्याचार झाले होते. 

2022 मध्ये झालेल्या एका चौकशीत इंग्लंड आणि वेल्समध्ये बाल लैंगिक शोषण ही एक गंभीर समस्या असल्याचे मान्य करण्यात आले आहे. लंडनमधील या ताज्या घटनेने आता पुन्हा एकदा गुन्हेगारांच्या दहशतीचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
 

Topics mentioned in this article