अमजद खान, प्रतिनिधी
Ganpat Gaikwad : कल्याण पूर्वचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरमधील पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या गोळीबाराला आता वर्ष होत आले आहे. या प्रकरणातील आरोपी वैभव गायकवाड, कुणाल पाटील, नागेश बडेराव हे अद्याप सापडलेले नाहीत. त्यांना शोधणाऱ्या पोलिसाना प्रत्येक आरोपीमागे 25 हजार रुपये बक्षीस देणार, अशी घोषणा गोळीबार प्रकरणातील पीडित महेश गायकवाड यांनी केली आहे. त्याचबरोबर माजी आमदार गणपत गायकवाड हे चेकअपच्या नावावर बाहेर पडतात. पनवेलच्या एका भाजप आमदारच्या फार्म हाऊसवर जाऊन पिकनिक करतात असा गंभीर त्यांनी केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
2 फेब्रुवारी 2004 रोजी उल्हासनगरमधील पोलीस स्टेशनमध्ये जागेच्या वादातून गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणातील आरोपी पदाधिकारी आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तो लोढा आणि दहा गाव परिसरात येऊन जातो याची माहिती पोलिसांना देऊन देखील त्याला पोलिस अटक करीत नाही. भाजपचा पदाधिकारी अस्लयाने पोलिसांवर या प्रकरणी दबाव आहे. भाजपने वैभवला पक्षाच्या पदावरुन दूर केलेले नाही, असा आरोप महेश गायकवाड यांनी केला आहे.
( नक्की वाचा : Pune School : तुमची मुलगी सुरक्षित आहे? पुण्यातील प्रसिद्ध शाळेच्या चेंजिंग रुमध्ये आढळला कॅमेरा! )
या प्रकरणातील आरोपी आमदार गायकवाड हे तळाेजा जेलला असले तरी चेकअपच्या नावाखाली ते जे. जे. रुग्णालयात जातात. त्यानंतर तिथून ते मुंबई फिरतात. त्यानंतर ते पनवेल येथीळ एका आमदाराच्या फार्म हाऊसवर जाऊन पुढे तळोजा जेलला रवाना होतात हा गंभीर आरोप देखील माजी नगरसेवक गायकवाड यांनी केला आहे.
कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करणारा आरोपी विशाल गवळी हा भाजपशी संबधित असल्याने त्याला पोलिस कोठडीत बिर्याणी खाऊ घातली असल्याचा आरोप माजी नगरसेवक गायकवाड यांनी केला. या प्रकरणी भाजप नेत्यांशी संपर्क साधला असता भाजप पदाधिकारी आणि माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या कुटुंबियांकडून प्रतिक्रिया दिली नाही.