Woman marries 5 times : लग्न, प्रेम, नातेसंबंध यांना धक्का देणारी एक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने एका पाठोपाठ एक अशा पाच तरुणांशी विवाह केले. पाच लग्नानंतरही तिचे समाधान झाले नाही. ती तिच्या दिराच्या प्रेमात पडली आहे. पीडित पतीने आरोप केला आहे की, या महिलेने अनेक वेळा बाहेरील मला मारहाण केली आहे. पीडिताच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशातील फतेहपूरमधील हा धक्कादायक प्रकार आहे. या प्रकरणात पीडित पतीनं पोलिसांकडं धाव घेत न्याय देण्याची मागणी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
'नवभारत टाईम्स' नं दिलेल्या माहितीनुसार फतेहपूरमधील राधानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील पंकज अग्रहरी नावाच्या तरुणाचे लग्न 16 एप्रिल रोजी बांदा जिल्ह्यातल्या एका महिलेशी झाले होते. या महिलेचे हे पाचवे लग्न होते. लग्नानंतर काही दिवस सर्व काही व्यवस्थित सुरू होते असे सांगितले जात आहे. मात्र, काही महिन्यांनंतर अचानक त्याच्या पत्नीचे त्याच्या धाकट्या भावासोबत (सख्खा दीर) प्रेमसंबंध सुरू झाले, असा आरोप पती पंकजने केला आहे.
( नक्की वाचा : Love Story : होणाऱ्या सुनेसोबत पळून जाऊन सासऱ्यानं केलं लग्न, रात्रीच्या Video कॉलमध्ये आले जवळ )
पतीला मारहाण आणि सासू-सासरे बेघर
पंकजनं केलेल्या आरोपानुसार, त्याच्या पत्नीनं पंकजच्या घरातून दागिने आणि रोख रक्कम आपल्या माहेरी पाठवली. त्याचबरोबर, तिने सासू-सासऱ्यांना बेघर केले. ती इतक्यावरच थांबली नाही तर तिनं बाहेरील मुलांना बोलावून अनेक वेळा पतीला मारहाण देखील केली.
( नक्की वाचा : सासऱ्यानं 24 वर्षांच्या सुनेचा बनवला Video, त्यानंतर दृश्यम स्टाईलनं केली हत्या! 2 महिन्यांनी उलगडलं रहस्य )
आपल्याला पत्नीपासून जीवाला धोका आहे, अशी तक्रार पीडित पंकजनं पोलिसांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. पंकजच्या पत्राच्या आधारे या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.