Husband Killed Wife : त्याचं अवघ्या सहा दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. अग्नीला साक्षी मानत त्यानं तिच्यासोबत सप्तपदीनं संसार सुरु केला. सात जन्म एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली. पण केवळ सहा दिवसांतच तो सारे वचन विसरून गेला. अजून तिच्या हातावरील मेहंदीचा रंगही फिका पडला नव्हता. तितक्यात तिला हे जग सोडावं लागलं. लग्नानंतर फक्त सहा दिवसांनंतरच त्याने आपल्या नवविवाहित पत्नीला लाठी-काठीने बेदम मारले (Varanasi Wife Murder). उत्तर प्रदेशातल्या वाराणसीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
नात्यांना काळिमा फासणारी ही घटना वाराणसीच्या चौबेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमौली गावात घडली आहे. राजू पालचे आरतीसोबत 6 दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. 44 वर्षीय राजूने कौटुंबिक भांडणात त्याची 26 वर्षांची पत्नी आरती पालला कथितरित्या लाठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि तिला नरपतपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले. जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
तिसऱ्या पत्नीची मारहाण करून हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती आणि राजूचे लग्न 9 मे रोजी झाले होते. हे राजूचे तिसरे लग्न होते. त्याचे पहिले दोन विवाह लवकर संपुष्टात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर लगेचच राजूचे आरतीसोबत भांडण सुरू झाले होते.
( नक्की वाचा : नागपूरमध्ये मशीद आणि मदरशाजवळ लागले QR कोड, ATS च्या तपासात काय संशय? )
हॉस्पिटलमध्ये पत्नीचा मृत्यू
पोलिसांनी आरोपी पती राजूला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली. पोलीस स्टेशनचे प्रभारी जगदीश कुशवाहा यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलिसांनी आरतीला नरपतपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले, परंतु तिला मृत घोषित करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.