300 रुपयांचे खोटे दागिने 6 कोटींना विकले, अमेरिकन महिलेची भारतात फसवणूक

या महिलेला 300 रुपयांचे खोटे दागिने 6 कोटींना विकण्यात आल्याचं उघड झालंय.

Advertisement
Read Time: 2 mins
जयपूर:

जगातल्या कोणत्याही भागातील महिलांना दागिन्यांचं आकर्षण असतं. वेगवेगळ्या प्रकारची दागिने खरेदी करण्याकडं महिलांचा ओढा असतो. ते दागिने खरेदी करण्यासाठी ते पैसे जमा करतात. महिलांच्या याच आवडीचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार देखील नवे नाहीत. अमेरिकन महिलेला देखील असाच अनुभव आलाय. या महिलेनं तिला 300 रुपयांचे खोटे दागिने 6 कोटींना विकले अशी तक्रार केली आहे.

काय आहे प्रकरण?

चेरीश असं या अमेरिकन महिलेचं नाव आहे. तिनं राजस्थानची राजधानी जयपूरमधल्या जोहरी बाजारमध्ये सोन्याचं पॉलिश असलेले चांदीचे दागिने विकत घेतले होते. अमेरिकेत यावर्षी एप्रिलमध्ये झालेल्या प्रदर्शनात तिनं हे दागिने ठेवले. त्यावेळी हे बनावट दागिने असल्याचं तिला समजलं. चेरीशनं तातडीनं भारतामध्ये येत तिला हे दागिने विकणारा दुकानदार गौरव सोनीला याबात जाब विचारला.

( नक्की वाचा : '15 मिनिटांमध्ये परत येतो' CBI च्या बोगस गँगनं HDFC च्या खात्यातून गायब केले 85 लाख रुपये )

चेरीशचा दावा दुकानदारानं फेटाळल्यानंतर तिनं या प्रकरणात जयपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणात तिनं अमेरिकन दुतावासाकडंही मदत मागितली आहे. चेरीशनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तिची गौरवची 2022 मध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. तिनं गेल्या दोन वर्षात गौरवकडून तब्बल 6 कोटींचे दागिने खरेदी केले आहेत. 

( नक्की वाचा : अभिनेत्रीला अश्लील फोटो, नाल्यात मृतदेह आणि स्टारला अटक! मर्डर मिस्ट्रीचं रहस्य काय? )

चेरीशनं पोलिसांमध्ये तक्रार करताच गौरव आणि त्याचे वडील राजेंद्र सोनी फरार झाले आहेत. या दोघांचाही सध्या शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांचा शोध घेण्यासाठी खास पथकांची स्थापना केला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. 

Advertisement
Topics mentioned in this article