नवरा-बायको आणि तीन मुलींची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या मेरठमधून समोर आली आहे. हत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या का आणि कुणी? हे अद्याप समोर आलेले नाही. पोलीस याचा तपास करत आहेत. फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकांच्या मदतीने या हत्याकांडाचा पोलीस तपास करत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मोईन (पती), आसमा (पत्नी), अस्सा (8 वर्ष), अजीजा (4 वर्ष), अबीबा (1 वर्ष) अशी मृतांचा नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री शेजारी राहणारा इमरान मोईन यांच्या घरी पोहोचला. घरात शिरल्यानंतर समोरील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची वाळूच सरकली.
(नक्की वाचा- मोबाईल, कपडे न मिळाल्यानं मुलाने स्वतःला संपवलं, बापानेही तिथेच जीव सोडला, नांदेडमधील हृदयद्रावक घटना)
कुटुबांतील सर्वच जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मोईन आणि आसमा बेडवर मृतावस्थेत पडले होते. तर तीन मुली बेडच्या बॉक्समध्ये मृतावस्थेत आढळले. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपासून मोईन यांच्या घराचा दरवाजा बंद होता. घरातही कोणतीही हालचाल दिसत नव्हती. त्यानंतर घरात पाहणी केली असता ही दुर्दैवी घटना समोर आली.
(नक्की वाचा- लग्नाच्या वाढदिवशीत दाम्पत्याने संपवलं जीवन, सुसाईड नोट वाचून सर्वच सून्न झाले)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोईन दीड महिन्यांपूर्वीच सुहेल गार्डन परिसरात राहण्यासाठी आले होते. तिथेच त्यांना भाड्याने घर घेतले होते. घराशेजारी जागा घेऊन ते तेथे घराचं बांधकाम करत होते. मात्र नवीन घराच्या बांधकामाशेजारी मोईन यांच्या घरातील कुणीही दिसत नव्हते.त्यानंतर शेजाऱ्यांनी शोध घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली.