Trending News: तुमच्या घरचे नोकर खरंच विश्वासू आहेत का? 'या' घरात 5 वर्ष सुरु होता भयंकर खेळ, वाचून येईल काटा!

एका निवृत्त रेल्वे अधिकाऱ्याने ज्या नोकरांवर विश्वास ठेवला, त्यांनीच त्यांचा आणि त्यांच्या आजारी मुलीचा घात केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
संपत्ती बळकावण्यासाठी या नोकर दांपत्याने बाप-लेकीला त्यांच्याच घरात तब्बल 5 वर्ष डांबून ठेवले होते.
मुंबई:

एका निवृत्त रेल्वे अधिकाऱ्याने ज्या नोकरांवर विश्वास ठेवला, त्यांनीच त्यांचा आणि त्यांच्या आजारी मुलीचा घात केला. संपत्ती बळकावण्यासाठी या नोकर दांपत्याने बाप-लेकीला त्यांच्याच घरात तब्बल 5 वर्ष डांबून ठेवले होते. त्यांना वेळेवर जेवण आणि पाणीही दिले जात नव्हते. या छळामुळे वडिलांचा मृत्यू झाला, तर त्यांची तरुण मुलगी अन्नावाचून केवळ हाडांचा सांगाडा उरली आहे. ही घटना जेव्हा उघडकीस आली, तेव्हा तिथे पोहोचलेल्या नातेवाईकांनाही धक्का बसला.

काय आहे प्रकरण?

ही हृदय पिळवटून टाकणारी घटना उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातून समोर आली आहे. महोबा येथील शहर कोतवाली भागातील हिंद टायर गल्लीत हे भयानक वास्तव उजेडात आले आहे.

ओमप्रकाश सिंह राठौर हे रेल्वेतून वरिष्ठ लिपिक म्हणून निवृत्त झाले होते. 2016 मध्ये पत्नीच्या निधनानंतर ते आपल्या 27 वर्षांच्या मानसिक आजारी असलेल्या रश्मी या मुलीसोबत वेगळ्या घरात राहायला गेले. 

( नक्की वाचा : Shocking : शरीरावर जखमा, अन् अंतर्वस्त्रे गायब; IT कंपनीच्या महिला मॅनेजरनं सांगितलं CEO नं कारमध्ये काय केलं? )

घराच्या देखभालीसाठी त्यांनी रामप्रकाश कुशवाहा आणि त्याची पत्नी रामदेवी या जोडप्याला कामावर ठेवले होते. मात्र, काही काळातच या नोकर दांपत्याने घराचा ताबा घेतला. त्यांनी ओमप्रकाश आणि त्यांच्या मुलीला खालच्या मजल्यावरील अंधाऱ्या खोलीत कैद केले आणि स्वतः वरच्या मजल्यावर आरामात राहू लागले.

Advertisement

जिवंत सांगाडा बनली तरुण मुलगी

जेव्हा नातेवाईक ओमप्रकाश यांना भेटायला यायचे, तेव्हा हे नोकर दांपत्य ते कुणालाही भेटू इच्छित नाहीत असे खोटे सांगून त्यांना परत पाठवत असे. तब्बल 5 वर्ष हा प्रकार सुरू होता. सोमवारी जेव्हा ओमप्रकाश यांच्या निधनाची बातमी नातेवाईकांना मिळाली आणि ते तिथे पोहोचले, तेव्हा समोरचे दृश्य पाहून सर्वजण हादरले. 

26 वर्षांची तरुण मुलगी रश्मी ही एका काळकोठडीत नग्न अवस्थेत पडलेली होती. अन्नाविना तिचे शरीर इतके सुकले होते की ती एखाद्या हाडांच्या सांगाड्यासारखी दिसत होती. तिची अवस्था एखाद्या 80 वर्षांच्या वृद्ध महिलेसारखी झाली होती. तिच्या शरीरात केवळ श्वास शिल्लक होता.

Advertisement

माणुसकीला काळिमा फासणारा शेवट

ओमप्रकाश यांचा मृतदेहही पूर्णपणे सुकलेला होता. एकेकाळी रुबाबात राहणाऱ्या या रेल्वे अधिकाऱ्याची अशी अवस्था पाहून शेजारीही स्तब्ध झाले आहेत. नोकरांनी केवळ मालमत्ता आणि बँक बॅलन्स हडपण्यासाठी या बाप-लेकीला अन्न-पाण्यावाचून तडफायला लावले. 

नातेवाईकांनी ओमप्रकाश यांना तातडीने रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपी नोकराची चौकशी सुरू केली आहे. रश्मीला आता तिचे काका-काकू त्यांच्यासोबत घेऊन गेले आहेत.
 

Advertisement
Topics mentioned in this article