Student Shot Teacher : नववीचा विद्यार्थी टिफिनमध्ये पिस्तूल घेऊन आला, शिक्षकावर झाडली गोळी

Student Shot Teacher : देशात एकामागून एक शालेय विद्यार्थ्यांच्या गुन्ह्यांच्या घटना उघड होत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Student Shot Teacher : विद्यार्थ्याने शाळेत येताना लंच बॉक्समध्ये पिस्तूल लपवले होते.
मुंबई:


Student Shot Teacher : देशात एकामागून एक शालेय विद्यार्थ्यांच्या गुन्ह्यांच्या घटना उघड होत आहेत. अहमदाबाद आणि मध्यप्रदेशनंतर आता उत्तराखंडमधून एक भयानक घटना समोर आली आहे. उत्तराखंडमधील काशीपूर (उधमसिंह नगर) येथील एका खासगी शाळेत बुधवारी 9 वीच्या एका विद्यार्थ्याने शिक्षकावर पिस्तूलने गोळीबार केला, ज्यात शिक्षक गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी शिक्षकाने एका प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिल्याने विद्यार्थ्याला थप्पड मारली होती.

त्याच थप्पडीचा बदला घेण्यासाठी विद्यार्थ्याने शाळेत येताना लंच बॉक्समध्ये पिस्तूल लपवले होते. जसा वर्ग संपला, विद्यार्थ्याने मागून खांद्याखाली गोळी मारली. यात शिक्षक गंभीर जखमी झाले. गगनदीप कोहली असं जखमी शिक्षकांचं नाव आहे. 

( नक्की वाचा : Murder in School : शाळेच्या आवारातच दहावीच्या विद्यार्थ्याची ज्युनियरनं केली हत्या, राज्यभर वातावरण तापलं )
 

गोळी थेट शिक्षकांच्या उजव्या खांद्याखाली लागली आणि पाठीच्या कण्याजवळ अडकली. एका खासगी रुग्णालयात तीन तासांच्या ऑपरेशननंतर डॉक्टरांनी गोळी शरीरातून बाहेर काढली. शिक्षकांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यासाठी पुढील 72 तास त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत, असं डॉक्टरांनी सांगितलं. 

( नक्की वाचा : Nora Fatehi : बायकोनं नोरा फतेही सारखं दिसावं म्हणून 3 तास जिम करायला लावायचा नवरा ! वाचा काय आहे प्रकरण? )
 

सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक टीमने प्रत्यक्षदर्शी पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळ (Juvenile Justice Board) समोर सादर करण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रकरणात पोलीस आरोपी विद्यार्थ्याच्या वडिलांचीही चौकशी करत आहेत, जेणेकरून घरात पिस्तूल कसे आले आणि विद्यार्थ्याने ते कसे मिळवले हे समजू शकेल.

Advertisement
Topics mentioned in this article