गुन्हेगारांनी तयार केलं सर्वोच्च न्यायालय, CJI देखील बनले! बड्या उद्योगपतीची 7 कोटींची फसवणूक

या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे गुन्हेगारांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड (Chief Justice of India DY Chandrachud) यांची नक्कल करत आभासी सर्वोच्च न्यायालय तयार केले होते.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

दिग्गज कापड व्यापारी आणि वर्धमान समुहाचे संचालक एसपी ओसवाल यांची सायबर गुन्हेगारांनी 7 कोटींची फसवणूक केली आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे गुन्हेगारांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड (Chief Justice of India DY Chandrachud) यांची नक्कल करत आभासी सर्वोच्च न्यायालय तयार केले आणि वर्धमान यांच्यावरील खटल्याची सुनावणी केली. वर्धमान यांनी केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा गौप्यस्फोट झाला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

वर्धमान समुहाचे संचालक असलेल्या ओसवाल यांना 28 आणि 29 ऑगस्ट रोजी डिजिटल अटक करण्यात आली होती. त्यांच्या वेगवेगळ्या खात्यामधून तब्बल 7 कोटी रुपये काढून घेतले. पोलिसांनी यापैकी 5 कोटी रुपये परत मिळवण्यात यश मिळवलंय. आरोपींनी ओसवाल मनी लाँड्रींगच्या खटल्यात सहभागी असल्याचं सांगत त्यांच्याविरोधात चौकशीचा बनाव रचला होता. 

कशी झाली फसवणूक?

ओसवाल यांनी NDTV ला दिलेल्या माहितीनुसीार त्यांना 28 सप्टेंबर रोजी पहिल्यांदा फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीनं आपण सीबीआयच्या कुलाबा ऑफिसमधून बोलत असल्याचं सांगितलं. त्यानं माझं नाव आणि मोबाईल नंबरचा वापर चुकीच्या कामासाठी केल्याची माहिती दिली. इतकंच नाही तर या गुन्हेगारांनी ओसवाल यांचा जेट एअरवेज माजी संचालक नरेश गोयल यांच्याशी संबंधित आर्थिक घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला. गोयल यांना मनी लाँड्रींग खटल्यात अंमलबजावणी संचालनालयानं (ED) गोयल यांना अटक केली आहे.  

( नक्की वाचा : 45 दिवस झोप नाही, टार्गेट अपूर्ण, 'आई-बाबा, प्लीज...' वरिष्ठ अधिकाऱ्याचा धक्कादायक निर्णय! )
 

गुन्हेगारांच्या आभसी टोळीनं ओसवाल यांना त्यांच्या आधार कार्ड आणि अन्य कागदपत्रांचा दुरुपयोग झाल्याचं भासवलं. स्काईप कॉलवर या प्रकरणाची सुनावणीही घेतली. स्काईप कॉलवर मुख्य तपास अधिकारी आहे, असं भासवणाऱ्या व्यक्तीनं स्वत:चं नाव राहुल गुप्ता असल्याचं सांगितलं, अशी माहिती ओसवाल यांनी दिली. त्यानं ओसवाल यांची पाळत ठेवत असल्याचं सांगत त्याबाबतचे तब्बल 70 नियम त्यांना दिले. 

Advertisement

24 तास पाळत

गुन्हेगारांच्या अभासी टोळीनं ओसवाल यांची जबानी नोंदवली. त्यांना त्यांचे बालपण, शिक्षण. व्यवसाय आणि संपत्तीची माहिती विचारली. या टोळीनं ओसवाल यांना डिजिटल अटक केलं होतं. कोणत्याही खोलीत ते गेले तरी त्यांना कॅमेरा सुरु ठेवण्याची सूचना दिली होती. हे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकरण आहे. तुम्ही ही माहिती कुणालाही कळवली तर तुम्हाला तसंच संबंधित व्यक्तीला 3 ते 5 वर्ष शिक्षा होईल असंही धमकावलं, अशी माहिती ओसवाल यांनी दिली आहे. 

( नक्की वाचा : आईचा हत्या करून काळीज भाजून खाल्लं! कोल्हापुराच्या नराधमाची शिक्षा उच्च न्यायालयाकडून कायम )
 

CJI देखील बनले

ओसवाल यांनी अभासी टोळीतील गुन्हेगार न्या. चंद्रचूड कसे बनले याची माहिती देखील दिली आहे. आरोपींनी स्काईपवरील सुनावणीत बोगस सीबीआय कार्यालय तसंच सर्वोच्य न्यायालय देखील तयार केलं होतं. त्यांनी न्यायमूर्तीची ओळख सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड अशी करुन दिली. मात्र आपल्याला त्यांचा चेहरा पाहता आला नाही, असं ओसवाल यांनी सांगितलं. ती व्यक्ती सरन्याधीश चंद्रचूडच आहे, असं भासवण्यात गुन्हेगारी टोळी यशस्वी झाली. त्यांनी ओसवाल यांना शिक्षा सुनावली. 

Advertisement

या शिक्षेची प्रत व्हॉट्सअपवर पाठवली. त्यामधील आदेशानुसार ओसवाल यांनी वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये सात कोटी भरले. गुन्हेगारी टोळीनं पाठवलेली कागदपत्रं बनावट असल्याचं ओसवाल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली. पोलिसंनी या प्रकरणात आत्तापर्यंत पाच कोटी 25 लाख रुपये परत मिळवले आहेत. 

पोलिसांच्या चौकशीत आंतरराज्य टोळीचा या प्रकरणाशी संबंध आहे. आत्तापर्यंत आंतू चौधरी आणि आनंद कुमार या दोन आरोपींना आसाममधील गुवाहटीमध्ये अटक करण्यात आली आहे. हे दोघंही किरकोळ व्यापारी आहेत.  
 

Advertisement