Vasai Crime : 'रक्कम कमी करुन देतो', 2 लाख विजेच्या थकीत बिलासाठी महावितरणाच्या अधिकाऱ्याने मागितली लाच

या प्रकरणी वसईतल्या माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

मनोज सातवी, प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अर्थात महावितरणच्या वसई येथील उप व्यवस्थापक (वित्त व लेखा) कल्पेश जयवंत पाटील (वय 53 वर्षे) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे.

तक्रारदार यांची कंपनीचे नाव असलेले विद्युत मीटर 2010 सालापासून बंद करण्यात आले होते. त्या मीटरच्या वापराबाबत महावितरणकडून एकूण 2,06,920 रुपये इतकी थकीत वीजबिलाची रक्कम आकारण्यात येणार होती. ही थकीत बिलाची रक्कम कमी करण्याच्या मोबदल्यात कल्पेश पाटील याने तक्रारदाराकडे 35,000 रुपयांची लाच मागितल्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल करण्यात आली होती.

नक्की वाचा - Nagpur News : प्रेयसीच्या जळत्या सरणावर तरुणाची उडी; उपस्थितांनी धू धू धुतला

त्यानुसार ACB च्या पथकाने पडताळणीत बिलाची रक्कम 2,06,920 रुपये ऐवजी 60,000 रुपये भरणा करण्यास सांगितले आणि उर्वरित सवलतीसाठी 30,000 रुपये स्वतः साठी लाच म्हणून मागितल्याचे स्पष्ट झाले आणि कल्पेश पाटील याने तक्रारदाराकडून 30,000 रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी वसईतल्या माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Advertisement