Wardha Crime: गाड्यांचे जळीतकांड! नागरिक भयभीत अन् 51 हजारांचे बक्षीस, धुळ्यात काय घडतंय?

दुचाकी जाळल्याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र पोलिसांकडून देखील कोणालाही याप्रकरणी अद्याप पर्यंत ताब्यात घेतले नसल्याची माहिती मिळत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

नागिंद मोरे, धुळे: धुळे शहरामध्ये दुचाकी जाळण्याचे सत्र सुरु असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शहरातील काही भागांमध्ये नागरिकांच्या दुचाकी जाळण्यात आल्याचे प्रकार समोर येत आहेत. या गुन्हेगारांचा बंदोबस्त कसा करायचा? असा प्रश्न नागरिकांना पडला असून आता थेट  एका व्यक्तीकडून या आरोपींना पकडून देणाऱ्यास 51 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. 

Wardha News : शिक्षणासाठी विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, पालकांचा आक्रोश

याबाबत सविस्तर माहिती अशी की, धुळे शहरातील बिल परिसर भागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी जाळण्याचे सत्र सुरूच आहे. मात्र ह्या दुचाकी कोण व कशासाठी जाळत आहे? हे अद्यापपर्यंत समोर येऊ शकले नाही. दुचाकी जाळल्याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र पोलिसांकडून देखील कोणालाही याप्रकरणी अद्याप पर्यंत ताब्यात घेतले नसल्याची माहिती मिळत आहे. 

आज पहाटेच्या सुमारास धुळे शहरातील मिल भागात असलेल्या सुदर्शन नगर मधील रोहित म्हसदे नामक तरुणाची दुचाकी अज्ञातांनी जाळून टाकली आहे. सदर घटना लक्षात येताच रोहित व त्याच्या परिवाराने दुचाकी विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती पूर्णपणे जळून खाक झाली. यावेळी रोहित म्हसदे याने प्रतिक्रिया देताना सांगितले की, आमच्या भागामध्ये सतत दुचाकी जाळण्याचे प्रकार सुरू आहे.

Navi Mumbai Crime: संतापजनक! कॉम्प्युटर क्लासेस चालकाकडून महिला सहकाऱ्याचा विनयभंग

मात्र अद्याप पर्यंत पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही. पहाटेच्या सुमारास माझी देखील दुचाकी जाळण्यात आली आहे, जो कोणी माझी दुचाकी कोणी जाळली हे पुराव्यासह सांगेल त्याला आम्ही 51 हजार रुपयांचे बक्षीस देऊ असे अजब आवाहन रोहित म्हसदे यांनी यावेळी केले आहे. त्यामुळे आता या दुचाकी जाळणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article