Maharashtra Womens Beat Bus Driver: महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पुरूषावर महिलांना अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा आरोप आहे. त्या पुरूषाच्या वागण्याला कंटाळून पीडितेने तिच्या सहकाऱ्यासह त्याला चांगलीच मारहाण केली. या मारहाणीचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन महिला रस्त्याच्या मधोमध एका पुरूषाला मारहाण करताना दिसत आहेत. मारहाण झालेला पुरूष हा बस ड्रायव्हर असल्याचे वृत्त आहे. त्याच्यावर महिलांचे फोन नंबर मिळवून त्यांच्या फोनवर अश्लील व्हिडिओ (Obscene Clips) पाठवल्याचा आरोप आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पीडितेने काही महिन्यांपूर्वी कणकवली येथील एका तिकीट बुकिंग ऑफिसमध्ये एका खाजगी कंपनीकडून बस तिकीट बुक केले होते. ती जेव्हा जेव्हा कणकवलीहून मुंबईला जायची तेव्हा ती त्याच कंपनीच्या बसने प्रवास करायची. जेव्हा आरोपी बस ड्रायव्हरला लक्षात आले की ती महिला नियमितपणे त्याच कंपनीच्या बसने प्रवास करत होती, तेव्हा त्याने तिकिट बुकिंग रेकॉर्डमधून तिचा फोन नंबर मिळवला आणि नंतर तिला अश्लील व्हिडिओ पाठवू लागला.
काही दिवसांपूर्वीच महिला तिच्या मैत्रिणीसोबत आली होती. आरोपीने पुन्हा तिच्या फोन नंबरवर तिचे अश्लील व्हिडिओ पाठवले तेव्हा पीडिता तिच्या एका सहकाऱ्यासह कणकवली येथील तिकीट बुकिंग सेंटरवर गेली, तिथे बस ड्रायव्हरला शोधून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडल्याचे वृत्त आहे. या मारहाणीचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.