मनोज सातवी, विरार:
Virar Crime: विरारच्या एमबी इस्टेटमधील श्री संगम इमारतीत राहणाऱ्या महेश सोनी याने आपल्या लहान बहिणीच्या मदतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्पना सोनी (३५) असे या हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. कल्पनाच्या डोक्यावर आणि कपाळावर धारधार हत्याराने वार केल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
विवाहितेची हत्या
याप्रकरणी आरोपी पती महेश सोनी (३८) आणि नणंद दिपाली सोनी (३५) या दोघांना बोळींज पोलिसांनी अटक केली असून त्यांना 2 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती बोळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Dhule Newe: मुलींची छेड काढायला गेले, रोड रोमिओ चांगलेच फसले, नागरिकांनी तुडव- तुडव तुडवले
याबाबत सविस्तर माहिती अशी की, विरार पश्चिमेच्या एम बी ईस्टेट मधील संगम सोसायटीमध्ये पतीसोबत राहत होती. २०१५ मध्ये तिचे लग्न महेश सोनी याच्यासोबत झाले होते. लग्नानंतर सासरची मंडळी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. त्यामुळे त्यांच्यात वारंवार भांडणं होत असायची. शनिवारी सकाळी ९ वाजता त्यांच्यात पुन्हा भांडण झाले.
यावेळी कल्पनाने घर सोडून जात असल्याचे सांगत आपले स्त्रीधन परत मागितले. यावेळी झालेल्या भांडणात पती महेश सोनी (३८) आणि नणंद दिपाली सोनी (३५) या दोघांनी मिळून कल्पनाला मारहाण केली. तिच्या डोक्यावर आणि कपाळावर धारधार हत्याराने वार केले. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
पतीविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी मयत कल्पनाचे मामा मनोहर सोनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोळींज पोलिसांनी पती महेश आणि नणंद कल्पना यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तसेच वसई न्यायालयाने पती आणि नणंदेला त्यांना 2 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Washim News : जैन मंदिर परिसरात राडा; श्वेतांबर पंथीयांकडून मारहाण, धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद