रामचंद्र काकराणी यांचा विरार इथे पेट्रोल पंम्प आहे. सोळा दिवसा पूर्वी त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. पण ही हत्या का झाली? कुणी केली? याचा उलगडा होत नव्हता. पोलीसांना कोणताही क्ल्यू मिळत नव्हता. अशा वेळी या प्रकरणाचा जवळपास सोळा दिवसानंतर छडा लावण्यात पोलीसांना यश आलं. या हत्ये प्रकरणी दोघांना थेट उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आलं आहे. ज्यावेळी त्यांची चौकशी केली त्यावेळी खतरनाक हत्येचा कट उघड झाला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उल्हासनगरमध्ये राहाणारे रामचंद्र काकराणी याचे अपहरण करण्यात आले होते. ते पेट्रोल पंम्पाचे मालक असल्याने पैशासाठी त्यांचे अपहरण करण्यात आले असावे असा पहीला अंदाज होता. मात्र 25 ऑगस्टला मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई फाटा येथे त्यांचा मृतदेह सापडला. त्यामुळे ही हत्या असल्याचे समोर आले. या हत्येचा कट सात महिन्या पूर्वीच केला होता. त्याचा मास्टर माईंड त्यांचाच गाडीचा चालक मुकेश खूबचंदाणी याचा होता. त्याला निल राजकुमार उर्फ नेपालउर्फ सहानी उर्फ थापा याची साथ मिळाली. रामलाल यादव या तिसऱ्या आरोपी ही त्यांच्या बरोबर मिळाला होता.
ट्रेंडिंग बातमी - दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मिळावे! अर्ज कोणी केला? ठाकरे की शिंदे गटाने?
काकराणी हे जवळपास 75 वर्षाचे होते. त्याचा गैरफायदा या आरोपींनी घेतला. चालक असलेल्या मुकेशने त्यांचे गाडीतूनच अपहरण केले. त्यांना मुंबई अहमदाबाद महामार्गावरील निर्जन स्थळी नेण्यात आलं. गाडीच त्याचा रूमालाच्या सहाय्याने गळा आवळण्यात आला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाला आहे याची खात्री झाल्यानंतर मृतदेह गाडीच सोडून ते तिथून गुजरातच्या दिशेने पळाले. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या गाड्याही बदलल्या. मध्यप्रदेशातून नंतर ते उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथं पोहोचले. तिथून नेपाळ सीमेवर ते गेले. पोलीसांनी सोळा दिवसानंतर त्यातील चालक असलेल्या मुकेश आणि थापाला पोलीसांनी अटक केली. त्यानंतर त्यांची चौकशी केली.
ट्रेंडिंग बातमी - कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूशखबर! केंद्र सरकारचा निर्यात शुल्काबाबत मोठा निर्णय
चौकशीमध्ये आपण खून केला असल्याची कबूली या दोघांनी दिली. शिवाय का खून करत आहे याचाही उलगडा त्यांनी केला. रामचंद्र काकराणी यांच्याकडे 10 लाख किंमतीची हिऱ्याची अंगठी होती. शिवाय हातात तब्बल 5 लाखाचे घड्याळ होते ते नेहमी हे घालत असतं. यावरच या चालकाची नजर होती. शिवाय गाडीत अनेक वेळा लाखो रूपयांची कॅश असायची याचीही माहिती त्या चालकाला होती. त्यामुळे त्यांने कट रचून त्यांची हत्या केली. पोलीसांनी या दोघांकडून हिऱ्याची अंगठी आणि पाच लाखाचे घड्याळ हस्तगत केले आहे. आरोपी चालक मुकेश खूबचंदाणी याच्यावर मुंबईत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 6 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.