Atul Subhash Case : बंगळुरुमधील AI इंजिनिअर अतुल सुभाषच्या आत्महत्येनं संपूर्ण देशात खळबळ उडालीय. अतुल यांनी मृत्यूपूर्वी 40 पानांची सुसाईड नोट तसंच तासभराचा व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. या व्हिडीओमध्ये त्यांनी पत्नी निकिता सिंघानिया (Nikita Singhania) आणि त्याच्या सासरच्या मंडळींवर आरोप केले आहेत. अतुल यांच्या खुलाशानंतर निकितावर सोशल मीडियावरुन जोरदार टीका होत आहे. अतुल यांच्या मृत्यूचा आरोप असलेली निकीता कोण आहे? याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहे निकिती सिंघानिया?
अतुल यांच्या आत्महत्येनंतर माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार अतुल आणि निकिता सिंघानिया यांची भेट एका मॅरेज वेबसाईटवर झाली. या दोघांनी 2019 साली लग्न केलं. लग्नानंतर सुरुवातीला सारं काही बरं होतं. त्यांना 2020 साली एक मुलगा झाला. त्यानंतर सर्व परिस्थिती बिघडत गेली, असा आरोप अतुलनं केला आहे.
अतुलच्या आरोपानुसार निकिता 2021 मध्ये मुलासह माहेरी निघून गेली. ती उत्तर प्रदेशातील जौनपुरची आहे. जौनपुरच्या पोलीस स्टेशनमध्ये अतुलवर वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या. या तक्रारीच्या माध्यमातून आपला छळ झाला, असा आरोप अतुलनं केला. निकितानं अतुलवर एकूण 9 केस दाखल केल्या होत्या. त्यामध्ये हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोपही होता.
( नक्की वाचा : Atul Subhash : 'बाळा, हे पाकीट 2038 मध्ये उघड', बंगळुरुच्या इंजिनिअरनं मृत्यूपूर्वी मुलाला दिलं गिफ्ट )
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार निकिता ही वर्किंग वुमन होती. ती दिल्लीमध्ये Accenture या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होती. अतुलची आई गृहिणी आहे. तर भावाचं कपड्याचं दुकान आहे. निकिताच्या वडिलांचं निधन झालंय. त्यांच्या मृत्यूसाठीही निकीतानं अतुलला जबाबदार धरलं होतं.
निकिताचं तिच्या सासू सासऱ्यांशीही जमत नव्हतं, असा आरोप अतुल यांनी केला आहे. ती लग्नानंतर फक्त दोन दिवस सासरी गेली होती. त्या काळात ती फक्त एकदा आपल्या आई-वडिलांना भेटली, असा आरोप अतुल यांनी केला होता. इतकंच नाही तर निकितामुळे आपल्या आई-वडिलांनी नातवाचं तोंडही पाहिलं नाही, असा आरोप अतुल यांनी व्हिडिओमध्ये केला.
( नक्की वाचा : घरगुती हिंसाचारात विवाहित महिलांपेक्षा तिप्पट पुरुषांनी दिला जीव, NCRB ची धक्कादायक आकडेवारी )
निकिती सिंघानियाचं नाव या प्रकरणात उघड झाल्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे. Accenture कंपनीनं तिला कामावरुन काढून टाकावं अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे.
निकिताच्या आईची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान निकिता सिंघानियाच्या आईंनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.आम्हाला मृत्यूबाबत खेद आहे, पण आम्ही या प्रकरणात दोषी नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. 'अतुल यांचे आरोप निराधार आहेत. त्यांनी स्वत:चं फ्रस्टेशन बाहेर काढलंय. माझ्या मुलीनं कधीही कुणाला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडलं नाही, असं त्यांनी सांगितलं.