Radhika Yadav : टेनिसपटूचा 'तो' निर्णय ठरला वडिलांच्या संतापाचं कारण, लेकीवरच झाडल्या 5 गोळ्या

Radhika Yadav Case : दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Radhika Yadav Murder News : राधिका यादवच्या एका निर्णयामुळे वडिल संतापले होते.
मुंबई:

Tennis Player Radhika Yadav Murder News : दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली. यामध्ये एका वडिलांनी राज्य पातळीवर खेळणाऱ्या टेनिसपटू मुलीला गोळ्या झाडून ठार केलं. राधिका यादव असं या टेनिसपटूचं नाव होतं. राधिकानं राज्य पातळीवर अनेक विजेतेपदे पटकावली होती. पण, तिच्या वडिलांनी राधिकावर एकामागोमाग पाच गोळ्या झाडल्या.  मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांच्या गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न झालेल्या राधिकाला रुग्णालयात नेण्यात आले, तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. 

नेमके काय घडले?

ही घटना गुरुवारी दुपारी 12 च्या सुमारास सेक्टर 57 येथील निवासस्थानी घडली. राधिका तिच्या कुटुंबासोबत तिथे राहत होती. आरोपी वडिलांनी राधिकावर एकापाठोपाठ गोळ्या झाडल्या. गुरुग्राम पोलिसांनी हत्या करणाऱ्या वडिलांना अटक केली असून, घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेले रिव्हॉल्वरही जप्त केले आहे.

( नक्की वाचा : Radhika Yadav: 17 लाख भाडं, मुलीला 2 लाखांचं टेनिस रॅकेट! राधिकची हत्या करणाऱ्या वडिलांबाबत धक्कादायक खुलासा )
 

कोण होती राधिका यादव?

राधिका राज्यस्तरीय टेनिसपटू होती आणि तिने अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या (ITF) दुहेरी टेनिसपटूंच्या क्रमवारीत राधिका यादव 113 व्या क्रमांकावर होती. राधिका यादवचा जन्म 23 मार्च 2000 रोजी झाला होता. ती ITF दुहेरीच्या पहिल्या 200 खेळाडूंमध्ये होती.

पोलीसांकडून मोठा खुलासा

गुरुग्राम पोलिसांनी टेनिसपटू राधिका यादवच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. पोलीस प्रवक्ते संदीप यांच्या माहितीनुसार, सेक्टर-57 सुशांत लोक फेज-2 मध्ये राहणारे दीपक यादव प्रॉपर्टी डीलर आहेत. त्यांची 25 वर्षांची मुलगी राधिका यादव टेनिसपटू होती. गेल्या काही दिवसांपासून राधिकाने परिसरात एक टेनिस कोचिंग अकादमी सुरू केली होती. यामध्ये अनेक तरुण-तरुणी प्रशिक्षण घेण्यासाठी येत होते. 

Advertisement

( नक्की वाचा : Radhika Yadav: महिला टेनिसपटूची बापानंच केली गोळ्या झाडून हत्या! वाचा का उचललं टोकाचं पाऊल? )
 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही अकादमी बंद करण्यासाठी दीपक आपल्या मुलगी राधिकावर दबाव आणत होता, परंतु राधिका नकार देत होती. आज दोघांमध्ये इतका वाद झाला की, दीपकने रागाच्या भरात राधिकावर गोळ्या झाडल्या. या गोळ्या तिच्या कमरेला लागल्या.

पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांना परिसरातील खासगी रुग्णालयातून एका युवतीला गोळी मारल्याची माहिती मिळाली होती. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा मृताचा काका तेथे उपस्थित होता, ज्याने राधिकाला घरातच गोळ्या मारल्याची माहिती दिली. जेव्हा पोलीस घरी पोहोचले, तेव्हा दीपक घरातच बसलेला होता, त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याचे परवानाधारक रिव्हॉल्वरही जप्त करण्यात आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस वडिलांचीही चौकशी करत आहेत.
 

Advertisement