Yash Dayal : आयपीएल 2025 विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे (RCB) फास्ट बॉलर यश दयाळ याच्यावर नव्याने काही आरोप करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एका महिलेने नुकताच त्याच्यावर लग्नाचं आमिष देऊन शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर तिने क्रिकेटपटूवर आणखी काही आरोप केले आहेत.
या महिलेनं आता आरोप केला आहे की, 'यश दयाळने त्यांच्या साडेचार वर्षांच्या संबंधात अनेक प्रेमसंबंध ठेवले होते. तसेच, तिने दयाळवर पैसे, प्रसिद्धी आणि सत्तेचा वापर करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला आहे. यश दयाळनं फसवणूक केल्याचा दावा करणाऱ्या आणखी एका महिलेच्या आपण संपर्कात असल्याचंही तिने सांगितलं.
काय आहेत आरोप?
या तक्रारदार महिलेनं सांगितलं की, 'मी यश दयाळच्या घरी 15 दिवस राहिले. त्याने मला उटीला फिरायलाही नेले होते. मी त्याच्या घरी अनेक वेळा गेले आहे. त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवला आहे. यश दयाळ आणि त्याच्या कुटुंबीयांनी लग्नाची खात्री देऊन आशा वाढवत ठेवल्या,' असे गाझियाबादच्या महिलेने सांगितल्याचं वृत्त दैनिक भास्करनं दिलं आहे.
'यश दयाळने पैशाच्या बळावर हे प्रकरण फिरवण्याचा प्रयत्न केला आहे, पण माझा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. पोलिसांनी सांगितले आहे की यश दयाळला नोटीस पाठवण्यात आली आहे,' असे म्हणत महिलेने फास्ट बॉलरवर सत्ता, प्रसिद्धी आणि पैशाचा वापर करून प्रकरण दाबण्याचा आरोप केला आहे.
( नक्की वाचा : Rishabh Pant : '.... तर ऋषभ पंतचा जीवही जाऊ शकतो!', पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा गंभीर इशारा )
आणखी 3 महिलांशी संबंध?
या महिलेने सांगितले की, यश दयाळचे इतर महिलांशी संबंध असल्याच्या तिच्या शंका 17 एप्रिल 2025 रोजी एका दुसऱ्या महिलेने तिच्याशी संपर्क साधल्यावर निश्चित झाल्या. त्या महिलेने कथितरित्या दयाळने फसवणूक केल्याचे आणि इतर अनेक महिलांशी बोलल्याचे पुरावेही दिले आहेत.
गाझियाबादमधील या महिलेने असेही म्हटले आहे की, तिला दयाळचे किमान तीन इतर महिलांशी संबंध असल्याची माहिती आहे.
'मी बाजूला होऊ शकले असते, पण त्याने फसवणूक केली हे मला कसे कळणार होते? त्याने कधीच ते दाखवले नाही. मी देवाला सोडून दिले होते, पण जेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी माझ्याबद्दल वाईट बोलणे सुरू केले, तेव्हा मी कायदेशीर पावले उचलण्याचा निर्णय घेतला," असे महिलेने सांगितल्याची माहिती या वृत्तामध्ये देण्यात आली.
'मी त्याला देवाच्या भरवशावर सोडले होते, पण त्यानंतर यश दयाळ आणि त्याच्या कुटुंबीय खूप वाईट बोलले. प्रेमात स्वाभिमान नावाची गोष्ट असते, ज्या मुली गमावतात. मी त्या लहान मुलीसाठीही लढत आहे जिच्यासोबत यश दयाळने चुकीचे केले. यश दयाळ लपून बसला आहे, त्याला लपून राहू द्या. हेच त्याच्या कुटुंबीयांनी आणि त्याने केले आहे,' असेही तिने पुढे जोडले.
यश दयालची क्रिकेट कारकीर्द सध्या चांगलीच बहरलेली आहे. यावर्षी आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) टीमचा तो सदस्य होता. त्याचबरोबर 2024 साली त्याची टीम इंडियाच्या टेस्ट
टीममध्येही निवड झाली होती.