यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा शहरात हादरवून टाकणारी घटना घडली आहे. इथं रेल्वे उड्डाण पुलासाठी खड्डा करण्यात आला होता. या भागात पाऊस पडत असल्यामुळे या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पाण्यात खेळण्यासाठी चार मुले गेली होती. हे चौघे ही अल्पवयीन आहेत. खेळण्याच्या नादात त्यांनी या खड्ड्यात उड्या घेतल्या. पण दुर्दैवाने त्यांचा त्यात पडून मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास दारव्हा परिसरात घडली आहे. रीहान असलम खान वय वर्ष 13, गोलु पांडुरंग नारनवरे वय वर्ष 10, सोम्या सतीश खडसन वर्ष 10 आणि वैभव आशीष बोधले वर्ष 14 हे चौघे जण त्या खड्ड्यात खेळण्यासाठी गेले होते. हे चौघे ही दारव्हा इथले रहिवाशी आहे. त्यांनी या खड्ड्यात उडी घेतली. पण पाणी खोल असल्याने ते चौघे ही पाण्यात बुडू लागले. पण आजूबाजूला कोणी नसल्याने त्यांना वाचवता ही आले नाही.
कोणी तर बुडत असल्याची बातमी गावात परसली. त्यानंतर अनेकांनी घटना स्थळी तत्काळ धाव घेतली. खड्ड्यातून त्या मुलांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने यवतमाळ येथील रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर त्याना मृत घोषीत करण्यात आले. त्यावेळी त्या मुलांच्या कुटुंबीयंनी हंबरडा फोडला. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.