Crime news : लग्नाचं आमिष, शारीरिक संबध, 1 लखोबा लोखंडे अन् 25 महिला, 'असा' अडकला जाळ्यात

पुढे त्या महिलेने लग्नाचा तगादा सुरू केला. त्यावेळी आपल्याला ब्रेन ट्यूमर झाल्याचे सांगत महिलेला टाळण्यास त्याने सुरुवात केली.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

एकीकडे मुली मिळत नसल्याने लग्न रखडलेल्या तरुणांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे शादी डॉट कॉमच्या माध्यमातून एकाने 25 पेक्षा  जास्त महिलांना गंडा घातला आहे. लग्नाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करणाऱ्या आणि मूळचा इंदापूर तालुक्यातील असणाऱ्या फिरोज निजाम शेख वय 32 वर्ष याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी पुण्यातून अटक केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मूळचा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील गंगावळणचा असणारा फिरोज शेख सध्या पुण्यातील कोंडव्यात राहत होता. घटस्फोटीत, विधवा महिलांना तो लक्ष्य करीत होता. त्यानंतर या महिलांची तो फसवणूक करायचा. त्याच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कोल्हापूरच्या पोलिस पथकाने त्याला पुण्यातून अटक केली आहे. यापूर्वी त्याच्यावर इंदापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. शिवाय काही ठिकाणी तक्रार अर्ज ही आहेत. शेख याने 25 महिलांना गंडा घातल्याचे चौकशीत समोर आले आहे. यातील काही महिलांकडून त्याने लाखो रुपये उकळल्याचेही समोर येत आहे.  

ट्रेंडिंग बातमी - Nashik Crime : आताची मोठी बातमी, नाशिकमध्ये 23 वर्षीय तरुणाचा नायलॉन मांजाने गळा चिरून मृत्यू

कोल्हापुरातील एका घटस्फोटित महिलेने शादी डॉट कॉमवर नाव नोंदणी केली होती. त्यावरून तिचा मोबाइल नंबर मिळवून फिरोज शेख नावाच्या तरुणाने लग्न करण्याची तयारी दर्शवली. महिलेच्या घरी येऊन त्याने इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगितले. त्यानंतर ओळख वाढवून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. व्यावसायिक अडचण असल्याचे सांगून त्याने वेळोवेळी महिलेकडून 1 लाख 69 हजार रुपयांची रोकड घेतली. त्याच बरोबर 8 लाख 25 हजारांचे दागिने लांबवले. 

ट्रेंडिंग बातमी -Washim News : वीज बिल भरण्यासाठी आणली 7 हजारांची चिल्लर, थंडीतही महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना फुटला घाम

 पुढे त्या महिलेने लग्नाचा तगादा सुरू केला. त्यावेळी आपल्याला ब्रेन ट्यूमर झाल्याचे सांगत महिलेला टाळण्यास त्याने सुरुवात केली. त्याच वेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या महिलेने 10 जानेवारीला जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर कोल्हापूरच्या पोलिस पथकाने पुण्यातील कोंढवा येथून संशयिताला अटक केली. त्याचे एक लग्न झाले असून, कुटुंबात पत्नी आणि दोन मुले आहेत.