करण जोहरचा 'कुछ कुछ होता है' हा चित्रपट तुम्हाला नक्की नक्कीच आठवत असेल. 1998 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर यशाचे अनेक विक्रम केले. शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्यातील ही एक त्रिकोणी प्रेमकथा होती. या चित्रपटातील तिन्ही कलाकारांचे काम लोकांना खूप आवडले होते, पण राणी मुखर्जीच्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या सना सईदने मोठी लोकप्रियता मिळवली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चित्रपटात छोटी अंजलीच्या भूमिकेने सर्वांची मने जिंकणारी सना सईद आता मोठी झाली आहे. आम्ही तुमच्यासाठी तिचा एक लेटेस्ट फोटो घेऊन आलो आहोत, जो पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.
आता अशी दिसतेय सना सईद
'कुछ कुछ होता है'मध्ये निरागस दिसणारी सना सईद आता मोठी झाली आहे. सना सईद सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. सना सईद आता 36 वर्षांची झाली आहे, पण दुर्दैवानं ती फारशी लोकप्रिय झाली नाही. ती एक-दोन चित्रपटांव्यतिरिक्त काही डान्स रिॲलिटी शोमध्येही झळकली, पण असे असूनही तिला अपेक्षित यश मिळाले नाही.
( नक्की वाचा : मैंने प्यार किया कितीदा पाहिलाय? 'या' 5 गोष्टी माहिती आहेत का? सलमानचं सत्य समजल्यावर बसेल धक्का )
सना सईदचे वैयक्तिक आयुष्य
सना सईदने 2023 मध्ये तिचा दीर्घकाळचा प्रियकर साबा वॉनरशी साखरपुडा केला, जो एक हॉलीवूड साऊंड डिझायनर आहे आणि लॉस एंजेलिसमध्ये राहतो. सना अनेकदा त्याच्यासोबत तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.