स्मृती मंधाना-पलाशचं पॅचअप होणार? 28 वर्षांची 'ही' अभिनेत्री करणार फुल सपोर्ट, 'आता सर्वात महत्त्वाचं..'

पलाश मुच्छल आणि स्मृती मंधानाचे लग्न पुढे ढकलल्यापासून सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दलच्या वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. अशातच एका अभिनेत्रीने दोघांचीही परिस्थिती समजून घेत चाहत्यांना मोठं आवाहन केलंय.

जाहिरात
Read Time: 2 mins
Avika Gor Latest Interview
मुंबई:

Smriti Mandhana And Palash Muchhal Latest News : पलाश मुच्छल आणि स्मृती मंधानाचे लग्न पुढे ढकलल्यापासून सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दलच्या वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.सतत व्हायरल होत असलेल्या पोस्ट्समध्ये अनेक यूजर्स पलाश मुच्छलवर स्मृती मंधानाची फसवणूक केल्याचा आरोप करत आहेत.दररोज पलाशच्या जुन्या पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यामुळे दोघांच्या लग्नाबाबतचा विषय अधिकच चर्चेत राहिला आहे. अशातच  टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अविका गोरने स्मृती-पलाश लग्नाच्या वादाच्या चर्चांवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.अविकाने केवळ स्मृती आणि पलाश दोघांना पाठिंबा दिला नाही,तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अफवांवरही नाराजी व्यक्त केली.

अविका गोरने स्मृती मंधाना-पलाश मुच्छलला केला सपोर्ट

अविका गोरने म्हटलं आहे की,सध्या स्मृती आणि पलाश दोघेही अतिशय संवेदनशील टप्प्यातून जात आहेत आणि त्यांना सर्वात जास्त गरज आहे शांततेची,पाठिंब्याची आणि वैयक्तिक स्पेसची..अविकाने चाहत्यांना आवाहन करत म्हटलंय, विनाकारण कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू नये आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनावश्यक अंदाज बांधू नयेत.अविकाने स्पष्टपणे सांगितले की प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येतात आणि अशा वेळी बाहेरचा दबाव आणि अफवांमुळे परिस्थिती अधिक कठीण बनते. 

नक्की वाचा >> यालाच म्हणतात खरी मैत्री! स्मृती मंधानाच्या दु:खद काळात जेमिमा रॉड्रिग्जने घेतला सर्वात मोठा निर्णय

"अटकळांपासून दूर राहा,त्यांना स्पेस द्या.."

अविकाने चाहत्यांना केलेलं आवाहन सोशल मीडियावर कळीचा मुद्दा बनला आहे. अनेक यूजर्सने तिच्या मतांना सहमती दर्शवली आहे. तिचं म्हणणं आहे की, सेलिब्रिटीही माणसचं असतात. त्यांनाही भावनिक स्पेसची तितकीच गरज असते. जितकी एखाद्या सामान्य व्यक्तीला असते. काहींनी असेही लिहिले की जेव्हा स्टार्स कठीण काळातून जातात,तेव्हा खोट्या पोस्ट किंवा अफवा त्यांच्या मानसिक शांततेवर वाईट परिणाम करतात.

नक्की वाचा >> WPL Auctions : यंदाच्या डब्ल्यूपीएलची सर्वात महागडी खेळाडू कोण? स्मृती मंधानाचा रेकॉर्ड थोडक्यात वाचला!

सोशल मीडियावर अविकाला मिळतोय पाठिंबा

अविका गोरने जे मत व्यक्त केलं आहे, त्याला अनेक सेलिब्रिटींनीही पाठिंबा दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की पब्लिक फिगर्स असूनही स्मृती आणि पलाश यांना त्यांच्या गोपनीयतेचा अधिकार आहे आणि अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये माध्यमांनीही जबाबदारीने काम केलं पाहिजे.

Advertisement