A R Rehman Controversy: हिंदी सिने सृष्टीतील ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर रहमान यांनी केलेल्या एका वक्तव्याने बॉलिवूड जगतासह राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या ८ वर्षांत बॉलिवूडमध्ये आपल्याला कमी काम मिळत आहे धार्मिक किंवा जातीय' कारणं असू शकतात असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. 'बीबीसी एशियन नेटवर्क'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले असून, त्यावर आता सिनेसृष्टीतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
काय म्हणाले ए आर रहमान?
मुलाखतीदरम्यान रहमान यांना विचारण्यात आले की, ९० च्या दशकात तमिळ समुदायाबाबत बॉलीवूडमध्ये भेदभाव होता का? त्यावर बोलताना रहमान म्हणाले, "कदाचित त्यावेळी देवाने या गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्या असाव्यात. तेव्हा मला असे काहीही जाणवले नाही. मात्र, गेल्या ८ वर्षांत जेव्हापासून सत्तेची समीकरणे बदलली आहेत, तेव्हापासून काही गोष्टी बदलल्या आहेत. जे लोक सर्जनशील नाहीत, त्यांच्या हातात सत्ता आली आहे. मला थेट समोर कोणी काही बोलले नाही. पण मला असे ऐकायला मिळाले की माझ्या मागे धार्मिक कारणावरून राजकारण झाले."
छावाबाबतही मोठे विधान..
रहमान पुढे म्हणाले की, अनेकदा एखाद्या चित्रपटासाठी माझी निवड निश्चित झाल्यानंतरही संगीत कंपन्यांनी हस्तक्षेप करून माझ्याऐवजी पाच वेगवेगळ्या संगीतकारांना संधी दिली. तसेच यावेळी बोलताना त्यांनी छावा सिनेमाबाबतही मोठे विधान केले. छावा हा समाजात फूट पाडणारा चित्रपट आहे. मला वाटतं की या चित्रपटानं त्याचाचा फायदा उठवला . परंतु, या चित्रपटाचा मूळ उद्देश शौर्य दाखवणं हा होता, असं ए आर रहमान यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ए आर रहमान यांच्या या वक्तव्यावर ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मुंबईतील लोक रहमान यांचा खूप आदर करतात. कदाचित ते पाश्चिमात्य सिनेमातील कामात व्यस्त असतील असे त्यांनावाटले असावे, यात कोणताही धार्मिक कोन मला दिसत नाही, असं ते म्हणाले. तसेच तर गायक शान याने "चांगले संगीत देण्यावर लक्ष केंद्रित करा, जास्त विचार करू नका," असा सल्ला दिला आहे.
हत्या की अपघात? जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, दारुच्या नशेत समुद्रात मारली उडी