बॉलिवूडचे 'मिस्टर परफेक्शनिस्ट' अर्थात अभिनेता Aamir Khan हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आमिर म्हणजे प्रत्येक गोष्टीत परफेक्ट अशी त्याची एक प्रतिमा आहे. त्यांच्या मुलीच्या म्हणजेच आयरा खानच्या लग्नानंतर त्यांच्या कुटुंबात नवा सदस्य जोडला गेला आहे. तो म्हणजे आयराचा पती नुपूर शिखरे. नुपूर हा मराठी आहे. त्यामुळे मराठी कुटुंबा सोबर अमिर खानचे नाते जोडले गेले. आयरा खान हिने दोन वर्षांपूर्वी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे यांच्याशी विवाह केला होता. नुकतीच नुपूर शिखरे यांची आई Pritam Shikhare यांनी एका मुलाखतीत आमिर खान यांच्या एका खास इच्छेबद्दल माहिती दिली. ती म्हणजे अमिर खानच्या आवडत्या मराठी खाद्या पदार्था विषयी.
प्रीतम शिखरे यांच्या हातचे वरण भात
प्रीतम शिखरे या सोशल मीडियावर त्यांच्या रिल्समुळे चर्चेत असतात. त्यांनी मुलाखतीत सांगितले की, त्यांच्या सूनबाई आयरा खान आणि मुलाला त्यांच्या हातचे जेवण खूप आवडते. एका वाढदिवसाच्या जेवणावेळी त्यांनी उकडीचे मोदक बनवले होते. आयराला ते मोदक इतके आवडले की तिने प्रत्येक पाहुण्याला ते खाण्याचा आग्रह केला. प्रीतम शिखरे पुढे सांगतात की आमिर खान यांना ही मराठी खाद्य पदार्थ आवडतात. त्यांना वरण भात खूप आवडते. आमिर यांनी त्यांच्या हातचे वरण भात खाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
योग कधी जुळणार?
त्या आपल्या मुलाखतीत पुढे सांगतात की, "त्यांनी मला सांगितलं की मला तुमच्या हातचं वरण भात खायला आवडेल," असे त्या म्हणाल्या. मात्र, कामाच्या व्यस्ततेमुळे अद्याप तो योग जुळून आलेला नाही. तो योग लवकरच येईल अशी अपेक्षा ही प्रीतम यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी आयरा ही पुर्ण पणे कुटुंबात मिसळली असल्याचं आवर्जून सांगितलं. आपला मुलगा आणि सून आपली काळजी ही घेतात. त्यांनी मी केलेले जेवण खास करून मराठी पदार्थ आवडतात असं ही त्यांनी सांगितलं.
आयराची सासू म्हणून कौतुक
आयरा खान घरात सून म्हणून आल्यानंतर आयुष्यात काही बदल झाले का याबाबत ही प्रीतम यांनी विचारण्यात आले. त्याचे ही त्यांनी मनमोकळे पणाने उत्तर दिले. प्रीतम शिखरे म्हणाल्या की, प्रत्येक वेळी आयुष्यात बदल होत असतो आणि सुदैवाने त्यांच्या आयुष्यात चांगला बदल झाला आहे. "मी आयराची सासू आहे, याचा मला अभिमान वाटतो. तसेच, लोक मला प्रीतम म्हणून ओळखतात हे अधिक चांगले वाटते," असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र आता आपल्याला आयराच्या वडीलांना म्हणजेच आमिर खान यांनी वरण भात खावू घालण्याची प्रतिक्षा असल्याचं सांगितलं.