बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनचा अंतिम सोहळा आज पार पडणार आहे. मागील 70 दिवसांपासून बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी सुरु असलेली स्पर्धकांचा धडपड आज थांबणार आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनचा विजेता कोण होणार हे स्पष्ट होईल. सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, धनंजय पोवार हे सहा जण अंतिम फेरीत पोहोचले आहेत. प्रेक्षकांची जास्तीत जास्त मते कुणाला मिळणार यावरुन आजचा विजेता ठरणार आहे.
बिग बॉसच्या अंतिम सोहळ्याच्या काही तास आधी अभिजीत सावंतच्या इन्टाग्राम अकाऊंटवरुन केलेल्या एका पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 20 वर्षापूर्वीच्या एका अविस्मरणीय क्षणाची आज पुनरावृत्ती होणार का? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे.
अभिजीत सावंतच्या इन्स्टा अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "माझ्या सर्व चाहत्यांसाठी आणि समर्थकांसाठी आजचा निकाल काहीही असो, 20 वर्षांपूर्वी आपण ज्या क्षणी इतिहास घडवला त्या क्षणापर्यंत आपण एक प्रवास करूया."
या पोस्टमध्ये इंडियन आयडलच्या पहिल्या सीजनच्या अंतिम सोहळ्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. इंडियन आयडल म्हणून अभिजीत सावंतच्या नावाची घोषणा केल्याच्या क्षणाचा हा व्हिडीओ आहे. याच क्षणाची पुनरावृत्ती होणार का? हे आज पाहावं लागेल.
कोणता सदस्य आघाडीवर?
फायनल व्होटिंगमध्ये सध्या कोणता सदस्य आघाडीवर आहे, याची सर्वांना उत्सुकता आहे. 'बिग बॉस मराठी इरा 5' या इंस्टाग्राम पेजवर बिग बॉसच्या स्पर्धकांच्या व्होटिंगबद्दल अपडेट येत आहेl. यानुसार सूरज चव्हाण, अंकिता वालावरकर, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर अनुक्रमे आघाडीवर आहेत.