Shah Rukh Khan: 'तुमची जन्नत दुबईत, मग भारतात काय करताय?' शाहरुखच्या प्रामाणिकपणावर प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सवाल

Abhinav Kashyap Criticizes Shah Rukh Khan: चित्रपटसृष्टीतील परखड वक्तव्यांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक अभिनव कश्यपने बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Shah Rukh Khan: चित्रपट दिग्दर्शकानं शाहरुख खानवर जोरदार टीका केली आहे.
मुंबई:

Abhinav Kashyap Criticizes Shah Rukh Khan: चित्रपटसृष्टीतील परखड वक्तव्यांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक अभिनव कश्यपने बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान यांच्यावर गंभीर आरोप करत टीका केली आहे. कश्यपने शाहरुखची लाईफस्टाईल आणि सामाजिक योगदानावर प्रश्न उपस्थित केले आहे.

'दुबईत जाऊन रहा'

अभिनव कश्यप यांनी मुलाखतीत, शाहरुख खान यांच्या दुबईतील घराचा उल्लेख 'जन्नत' आणि मुंबईतील घराचा 'मन्नत' असा करत, त्यांच्या प्राधान्यक्रमावर टीका केली. ते म्हणाले, "हा समुदाय केवळ उपभोग (Taking) घेतो, समाजाला काहीही परत (Giving Back) करत नाही. जर दुबईतील घर तुमच्यासाठी स्वर्ग (जन्नत) असेल, तर भारतामध्ये तुम्ही कशासाठी आहात? तिथेच रहा." अभिनवने शाहरुखच्या बंगलातील नव्या बांधकामावरही टीका केलीय. घराचे सतत वाढणारे मजले हे शाहरुखच्या असमाधानी असल्याचं द्योतक आहे, असं अभिनव म्हणाला.

( नक्की वाचा : Sunjay Kapur property: प्रिया कपूर 'सिंड्रेलाच्या सावत्र आई'सारखी, करिश्माच्या मुलांनी कोर्टात केले नवे आरोप )
 

'जवान'मधील संवादाचाही उल्लेख

शाहरुख खानच्या जवान या चित्रपटातील गाजलेल्या डायलॉगचा  ("बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर") देखील अभिनवनं समादर घेतला. या लोकांनी आपले निवासस्थान सामान्य माणसाच्या आवाक्यापलीकडे नेले आहे. आता यांच्याशी संवाद साधणे शक्य नाही. शाहरुख बोलण्यात  हुशार असला तरी त्याचा उद्देश संशयास्पदच आहे, असं अभिनव म्हणाला. 

कोण आहे अभिनव?

अभिनव कश्यप हा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपचा भाऊ आहे. अभिनयनं सलमान खानची मुख्य भूमिका असलेला दबंग (Dabangg) हा चित्रपट 2010 साली दिग्दर्शित केला होता. तो सुपरहिट झाला. त्यानंतर त्यानं रणबीर कपूरसोबत 'बेशरम' हा सिनेमा बनवला. त्यानंतर त्यानं कोणत्याही चित्रपटाचे दिग्दर्शन केलेलं नाही. 

Advertisement

शाहरुख सध्या काय करतोय?

शाहरुख खानला त्याच्या जवान चित्रपटाच्या भूमिकेसाठी यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. शाहरुखला पहिल्यांदाच या पुरस्कारनं गौरवण्यात आलं. शाहरुख खान आता 2027 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या 'किंग' (King) चित्रपटाच्या निर्मिती आणि तयारीमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सुहाना खान, दीपिका पादुकोण, आणि अभिषेक बच्चन यांची भूमिका आहे.  
 

Topics mentioned in this article