Spirit Movie : प्रभाससोबत 'स्पिरिट'मध्ये झळकणार 'हा' मराठी स्टार; संदीप वांगा रेड्डीसोबत फोटो केला शेअर

संदीप रेड्डी वांगाच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात तृप्ती डिमरीचीही महत्त्वाची भूमिका होती. ज्याप्रमाणे अॅनिमलने तृप्तीला सुपरस्टार बनवले, त्याचप्रमाणे तिचा 'स्पिरिट' तिला भारतातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये पोहोचवेल असं बोललं जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

साऊथ सुपरस्टार प्रभासच्या बहुप्रतिक्षित 'स्पिरिट' सिनेमात मराठी अभिनेता झळकणार असल्याची माहिती समोर येत आहे. 'अ‍ॅनिमल' आणि तेलुगू चित्रपट 'संक्रांतिकी वास्तुनम'मधील भूमिकेसाठी प्रशंसा मिळवल्यानंतर उपेंद्र लिमये स्पिरिट सिनेमात दिसण्याची शक्यता आहे. 

अभिनेता उपेंद्र लिमयेने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. उपेंद्र लिमयेने अलीकडेच दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांना भेटल्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यात उपेंद्रने लिहिलं की,"रेड्डी ब्रदर्सना त्यांच्या हैदराबाद येथील भद्रकाली पिक्चर्स या नवीन कार्यालयात भेटून आनंद झाला. रेड्डी ब्रदर्स इन  हाय 'स्पिरिट'!" 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'स्पिरिट' या चित्रपटाबद्दल आधी मोठा वाद झाला होता. संदीप रेड्डी वांगा दीपिका पदुकोणला 'स्पिरिट' या चित्रपटात कास्ट करायचे होते. पण दीपिकाच्या काही अटी न पटल्याने दुसऱ्या अभिनेत्रीची चित्रपटात निवड करण्यात आली. त्यानंतर संदीप रेड्डी वांगा यांनी अभिनेत्री तृप्ती डिमरीला साइन केले. 

(नक्की वाचा : Sunjay Kapur : 10 दिवस लग्न, 126 देशातील पाहुणे, 100 कोटी खर्च! कोण होता संजय कपूरच्या पत्नीचा पहिला नवरा?)

संदीप रेड्डी वांगाच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात तृप्ती डिमरीचीही महत्त्वाची भूमिका होती. ज्याप्रमाणे अॅनिमलने तृप्तीला सुपरस्टार बनवले, त्याचप्रमाणे तिचा 'स्पिरिट' तिला भारतातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये पोहोचवेल असं बोललं जात आहे. 

'स्पिरिट' हा प्रभासच्या कारकिर्दीतील 25 वा चित्रपट आहे. संदीप रेड्डी वांगा एका वर्षापेक्षा जास्त काळ या चित्रपटाचे चित्रीकरण करण्याची योजना आखत आहेत. ज्यामध्ये स्टार कलाकारांचा समावेश आहे. हैदराबादमध्ये चित्रीकरण सुरू होईल आणि त्यानंतर भारतभर आणि परदेशात देखील अनेक ठिकाणी चित्रपटाचे शुटिगं होणार आहे. 
.

Topics mentioned in this article