टॅक्स वाचवण्यासाठी बनवला चित्रपट, फ्लॉप होण्याची केली प्रार्थना; पण झाला सुपरहिट! 40 वर्षे चालला खटला

आजपासून 67 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाच्या अभिनेत्याला मात्र तो चित्रपट सपशेल फ्लॉप व्हावा असे मनापासून वाटत होते. मात्र, अभिनेत्याच्या नशिबाने त्याला साथ दिली नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
आपला हा चित्रपट फ्लॉप व्हावा अशी किशोर कुमार यांनी प्रार्थना केली होती.
मुंबई:

कोणत्याही चित्रपट निर्माता, दिग्दर्शक किंवा अभिनेता आपला चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होऊ नये असे कधीही वाटत नाही. पण आजपासून 67 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाच्या अभिनेत्याला मात्र तो चित्रपट सपशेल फ्लॉप व्हावा असे मनापासून वाटत होते. मात्र, अभिनेत्याच्या नशिबाने त्याला साथ दिली नाही आणि तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर बंपर हिट ठरला. 

या चित्रपटाची सर्व गाणी लोक आजही आवडीने ऐकतात. खरं तर, टॅक्स चुकवण्यासाठी या अभिनेत्याला आपला चित्रपट फ्लॉप करायचा होता, पण जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो बॉक्स ऑफिसवर पाहता पाहता सुपर डुपर हिट झाला, त्यानंतर या अभिनेत्यावर टॅक्ससंदर्भात तब्बल 40 वर्षे खटला सुरू होता.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोणता आहे हा ब्लॉकबस्टर चित्रपट?

आम्ही तुम्हाला 1958 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चलती का नाम गाड़ी' या चित्रपटाबद्दल सांगत आहोत. सत्येन बोस या चित्रपटाचे दिग्दर्शक होते.  या चित्रपटात कुमार बंधूंची त्रिकुट, म्हणजेच अशोक कुमार, किशोर कुमार आणि अनुप कुमार, प्रमुख भूमिकेत होते. किशोर कुमारची पत्नी मधुबाला मुख्य अभिनेत्री होती.

'चलती का नाम गाडी' हा एक कौटुंबिक विनोदी-नाट्य चित्रपट होता आणि या चित्रपटाची गणना कल्ट क्लासिक चित्रपटांमध्ये केली जाते. किशोर कुमार यांना टॅक्सपासून वाचण्यासाठी फ्लॉप चित्रपट बनवायचा होता. यासाठी त्यांनी दोन चित्रपट बनवले होते - ‘लुकचुरी' (बंगाली) आणि ‘चलती का नाम गाड़ी' (हिंदी).

( नक्की वाचा : Aishwarya-Abhishek : ऐश्वर्याशी घटस्फोटाच्या चर्चेवर अभिषेकनं सोडलं मौन! गप्प बसण्याचं सांगितलं कारण )
 

बजेटच्या सातपट कमाई

‘चलती का नाम गाड़ी' हा चित्रपट 35 लाख रुपये बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. रिपोर्टसनुसार, या चित्रपटाने जगभरात आपल्या बजेटच्या सातपट म्हणजेच 2.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. एकट्या भारतात या चित्रपटाने 1 कोटी 25 लाख रुपये कमावले होते. 

Advertisement

‘चलती का नाम गाड़ी' हा 1958 सालचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. या चित्रपटातील एक नव्हे, तर सर्व गाणी चार्टबस्टर ठरली होती, ज्यात ‘एक लड़की भीगी-भागी सी', ‘हाल कैसा है जनाब का', ‘बाबू समझो इशारे', ‘हम थे वो थी' आणि ‘5 रुपया 12 आना' ही या चित्रपटामधील गाणी जोरदार गाजली.
 

Topics mentioned in this article