Instachi Star Song News: प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नविन गाणं “इंस्टाची स्टार” प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. हे गाणं प्रेक्षकांना एक ताजं आणि हृदयस्पर्शी संगीत अनुभव देण्याचे वचन देतं. गाण्यात लोकप्रिय अभिनेत्री अंकिता मेस्त्री आणि अभिनेता जगदीश झोरे यांची नवीन जोडी पाहायला मिळणार आहे. अभिजीत दाणी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला रोहित पाटील यांनी संगीत दिलं आहे. गायक शैलेश राठोड आणि गायिका कृतिका बोरकर यांनी हे गाण गायल आहे. हे गाण नाशिक मधील निसर्गरम्य ठिकाणी चित्रित करण्यात आलं आहे. हे गाणं अशा तरुण प्रेमकथांची कहाणी सांगतं, जे सोशल मीडियाच्या माध्यमातून मेहनत करून आपली कला सादर करून भविष्याचे स्वप्न रंगवतात.
श्रीजय क्रिएशन प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेल्या इंस्टाची स्टार गाण्याचे निर्माते जय पालवकर आहेत, तर नवनीत जाधव हे प्रोजेक्ट हेड आहेत. विनया सावंत व फॉरेवर पीआर कंपनीने लाइन प्रोड्यूसर आणि पब्लिसिटीची जबाबदारी सांभाळली आहे. गाण्याची कथा जय पालवकर यांनी लिहिली असून कोरिओग्राफी दिनेश शिरसाठ याने केली आहे. या गाण्याचे कॉस्ट्यूम आणि इपीचे काम प्रियांका क्षत्रिय व अभिषेक क्षत्रिय यांनी केले आहे. शैलेश राठोडने लिहिलेल्या गीताने या गाण्याला अधिक भावनिक खोली दिली आहे. या गाण्याचा संगीत अनावरण सोहळा नुकताच मुंबईत पार पडला.
अभिनेत्री अंकिता मेस्त्री हिने जाऊबाई गावात हा रिएलिटी शो केला आहे. तसेच या आधी तिची नखरेवाली आणि झुमका ही गाणी प्रचंड व्हायरल झाली आहेत. तर अभिनेता जगदीश झोरेची लयभारी दिसते पोर आणि रंभा गाणी पॉप्युलर आहेत. अभिनेत्री अंकिता मेस्त्री गाण्याविषयी सांगते, “मी श्रीजय क्रिएशन व निर्माते जय पालवकर यांचे आभार मानते की त्यांनी मला या गाण्यामध्ये संधी दिली. इंस्टाची स्टार हे खूप सुंदर गाणं आहे. मी गाणं ऐकताच या गाण्यासाठी हो म्हटलं. या गाण्यामधून एक वेगळीच वाईब येते. विशेष म्हणजे हे गाण आताच्या तरुण पिढीला आणि सोशल मीडिया वापरणाऱ्या जेनझी जनरेशनसाठी खास असेल. हे गाण सोशल मीडियावर ट्रेंडिंगला आहे. माझ्या फॅन्सना विनंती करते की तुम्ही माझ्या इतर गाण्यांवर जस प्रेम केल तसच या गाण्याला भरभरून प्रेम द्या. तसेच या गाण्यावर रील व्हिडिओ बनवून मला टॅग करा.”
निर्माते जय पालवकर या गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतात, “श्रीजय क्रिएशन हे स्वतंत्र म्युझिक चॅनल आहे. मी ३ वर्षापूर्वी मी हे चॅनल सुरू केल. तेव्हा मला रोहित राऊतसोबत काम करण्याची संधी मिळाली. या चॅनल वरती ५ गाणी या आधी प्रदर्शित झाली आहेत. त्यातील २ गाणी युकेला आम्ही चित्रित केली होती. त्यामुळे आम्ही या चॅनलची क्वॉलिटी टिकून ठेवली आहे. चॅनलची पीआर विनया सावंत हिने आम्हाला गायक शैलेश राठोडच एक स्क्रॅच गाण पाठवलं आणि ते गाण मला फार आवडलं. मग आम्ही इंस्टाची स्टार हे गाण करायचं ठरवलं तसेच या गाण्याची कथा मी लिहिली आणि अश्या पद्धतीने ही कलाकृती घडली. मला खात्री आहे की तुम्हालाही हे गाणं खूप आवडेल. तुम्ही नक्कीच या गाण्यावर थिरकणार आहात.
Disha Patani : अभिनेत्री दिशा पटानीच्या घराबाहेर गोळीबार, गँगस्टरचा गंभीर इशारा, कारण काय?
दिग्दर्शक अभिजीत दानी गाण्याच्या चित्रीकरणाविषयी सांगतो, इंस्टाची स्टार या गाण्याच दिग्दर्शन आणि छायाचित्रीकरण मी केल आहे. श्रीजय क्रिएशन या प्रोडक्शन सोबत मी पहिल्यांदाच काम केल परंतु त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला. जय सर, नवनीत सर आणि विनयाचे आभार की त्यांनी आम्हाला हे गाण करण्याची संधी दिली. हे गाणं नाशिकमध्ये आम्ही पावसाळ्यात शूट केले. पावसामुळे शेड्यूल खूप लांबत होते परंतु आम्ही हे शूट करण्याचं ठरवले. देवाची कृपा की अजिबात पाऊस पडला नाही. आम्ही या गाण्याची हुकलाईन ऊसाच्या मळ्यात शूट करत होतो. ऊस कापून झाल्यामुळे ती जमीन थोडी भुसभुशीत होती. आणि त्यावर अंकिताला हिल्स घालून स्टेप करायच्या होत्या. चांगल्या टेकलाच तिचा तोल सारखा जात होता पण तिने खूप सुंदररित्या ते सांभाळून घेतल. गाण्याच्या शूटला खूप मज्जा आली. प्रेक्षकांना गाण खूप आवडत आहे.