फॅन्ड्री चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरातने घराघरात लोकप्रियता मिळवली. या चित्रपटाने तिला जब्याची शालू अशी खास ओळखही दिली. सोशल मीडियावर राजेश्वरी नेहमीच सक्रिय असते. एकीकडे शालू सध्या नव्या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असतानाच तिने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्याची माहिती तिने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लोकप्रिय मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरातच्या नव्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. राजेश्वरी खरातने बाप्तिस्मा पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे राजेश्वरी खरातने ख्रिश्चन धर्म स्विकारल्याची चर्चा सुरु झाली आहे. राजेश्वरीने या पोस्टमध्ये तिने धर्म स्विकारल्याबद्दल कोणतीही अधिक माहिती दिली नसली तरी बाप्तिस्मा विधीचे फोटो पोस्ट केले आहेत.
बाप्तिस्मा म्हणजे ख्रिश्चन धर्म स्विकारण्याबाबतची प्रक्रिया असते, त्यानुसार बाप्तिस्मा मिळालेल्या व्यक्तीची ख्रिश्चन धर्मानुसार नव्या आयुष्याला सुरुवात होते. राजेश्वरी खरातने शेअर केलेल्या या फोटोवरुन तिने नवा धर्म स्वीकारल्याचे दिसत आहे. राजेश्वरीने हे फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या असून अनेकांनी तिला ट्रोलही केले आहे.
दरम्यान, राजेश्वरी खरात ही फॅन्ड्री या चित्रपटामधून घराघरात पोहोचली. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले. चित्रपटातील राजेश्वरीची शालू ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. तिच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले. त्यानंतर शालूने अनेक चित्रपट तसेच वेबसिरीजमध्ये काम केले.
ट्रेंडिंग बातमी - IPL 2025: दिमाखदार विजय.. पण एक चूक भोवली, शुभमन गिलला BCCIचा दणका