Actress Jyoti chandekar passes away : 'स्टार प्रवाह' वरील 'ठरलं तर मग' या मालिकेतून घरोघरी लोकप्रिय झालेल्या करारी पण प्रेमळ अशा 'पूर्णा आजी' म्हणजेच ज्योती चांदेकर यांचं निधन झालं आहे. त्या 68 वर्षांच्या होत्या. त्यांचं शनिवारी दुपारी पुण्यातील दिनानाथ हॉस्पिटलमध्ये निधन झालं अशी माहिती आहे. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. पण, त्यांच्या निधनाचं नेमकं कारण समजलेलं नाही.
ज्योती चांदेकर यांच्या पश्चात्य दोन मुली आहेत. त्या अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या आई होत्या. 'स्टार प्रवाह' वाहिनीनं देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
ज्योती चांदेकर यांनी 'तिचा उंबरठा', 'ढोलकी', 'सुखांत', 'मी सिंधुताई सकपाळ', 'फुलवात', 'देवा', 'श्यामची आई' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं होतं. त्याचबरोबर त्यांनी 'छत्रीवाली', 'तू सौभाग्यवती हो' यांसारख्या मालिकांमधील त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली. चांदेकर यांच्यावर रविवारी सकाळी (17 ऑगस्ट) पुण्यातील वैकुंठ स्माशनभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.