Arjun Tendulkar Wedding: ऐश्वर्या-अभिषेकचा समोर आला असा एक Video, चाहते म्हणाले, 'हीच खरी...

या सोहळ्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे ऐश्वर्या आणि अभिषेक हे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत दिसले नाहीत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Arjun Tendulkar Wedding: क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या त्याच्या आयुष्याची नवी इनिंग सुरू करत आहे. या शाही विवाह सोहळ्याला बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज उपस्थित राहिले. मात्र, या सर्वांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते म्हणजे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन या जोडीने. गेल्या काही काळापासून या दोघांच्या नात्यात दुरावा असल्याच्या चर्चा रंगत असताना, अर्जुनच्या लग्नात दोघांनी एकत्र हजेरी लावून सर्वांचे लक्ष वेधले. या लग्नातील त्यांचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. त्याव त्यांच्या चाहत्यांच्या असंख्य कमेंटही आल्या आहेत. 

ऐश्वर्या रायने या सोहळ्यासाठी हलक्या निळ्या रंगाचा (Light Blue) अत्यंत सुंदर पोशाख परिधान केला होता. तर अभिषेक बच्चन ब्लॅक अचकन सूटमध्ये रॉयल दिसत होता. पॅपराझीसमोर या दोघांनी दिलेली पोझ आणि त्यांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांनी त्यांना 'नंबर 1 जोडी' अशी पावती दिली आहे. त्यांच्या चहत्यांनी तर हीच खरी जोडी नंबर वन अशी प्रतिक्रीया दिली आहे.  ऐश्वर्याने निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आणि रेड लिपस्टिकसह आपला लूक पूर्ण केला होता. तिच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य चाहत्यांना घायाळ करत होते. दुसरीकडे, अभिषेक बच्चन आपल्या 'ऑल ब्लॅक' लूक आणि स्टायलिश चष्म्यात अगदी देखणा दिसत होता. दोघांचे एकत्र फोटो पाहून "जोडी असावी तर अशी," अशा कमेंट्स चाहत्यांकडून येत आहेत.

Advertisement

नक्की वाचा - Sachin Tendulkar: सचिनने लेकाच्या लग्नात बालमित्र विनोद कांबळीला आमंत्रित केलं होतं की नाही? सत्य आलं समोर

या सोहळ्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे ऐश्वर्या आणि अभिषेक हे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत दिसले नाहीत. रिपोर्ट्सनुसार, बच्चन कुटुंबातील इतर सदस्य उशिराने लग्नाला पोहोचले. कुटुंबाचा कोणताही एकत्रित फोटो समोर न आल्याने सोशल मीडियावर पुन्हा एकदा विविध चर्चांना उधाण आले आहे. लग्नात ऐश्वर्या-अभिषेक एकत्र दिसले असले तरी, ते जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत कुठेही दिसले नाहीत असं का अशी चर्चाही सोशल मीडियावर होत आहे. बच्चन कुटुंबाचा फॅमिली फोटो न दिसल्याने नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा तर्कवितर्क लढवायला सुरुवात केली आहे. मात्र, ऐश्वर्या आणि अभिषेकच्या एकत्र येण्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.