Entertainment News: ऐश्वर्या,तब्बूचा हिरो, पण पोट भरण्यासाठी चालवावी लागली टॅक्सी; अभिनेत्याचा खळबळजनक खुलासा

Mirza Abbas Ali: 90 च्या दशकात लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या या लोकप्रिय अभिनेत्याच्या आयुष्यात असाच एक धक्कादायक टप्पा आला होता.

जाहिरात
Read Time: 3 mins
Mirza Abbas Ali: ऐश्वर्या रायच्या या हिरोवर टॅक्सी चालवण्याची वेळ आली होती.
मुंबई:

Mirza Abbas Ali:  चित्रपटसृष्टीचा झगमगाट जितका आकर्षक असतो, तितकीच त्याची दुसरी बाजू अत्यंत आव्हानात्मक असू शकते. इथे एखादा कलाकार एका रात्रीत स्टार होतो, तर काही वेळातच त्याचे स्टारडम ओसरून तो अचानक गायबही होतो. 90 च्या दशकात लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या एका लोकप्रिय अभिनेत्याच्या आयुष्यात असाच एक धक्कादायक टप्पा आला होता.

ऐश्वर्या राय, तब्बू आणि रजनीकांत यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या या अभिनेत्याचे नाव मिर्झा अब्बास अली आहे. एका वेळी घर चालवण्यासाठी त्याला थेट परदेशात मेकॅनिक आणि टॅक्सी ड्रायव्हर म्हणूनही काम करावे लागले होते.

Advertisement

सुपरहिट पदार्पण अन् एका रात्रीत स्टारडम

1996 मध्ये दिग्दर्शक काथिर यांच्या 'काधल देसम' या चित्रपटातून अब्बासने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. ए. आर. रहमान यांचे संगीत असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवले आणि अब्बास एका रात्रीत स्टार झाला. यानंतर त्याने 'व्हीआयपी', 'पदयप्पा' आणि ऐश्वर्या रायसोबत 'कंडूकोंडेन कंडूकोंडेन' यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले.

( नक्की वाचा : राजेश खन्नांनी ओढावून घेतला मृत्यू! शेवटच्या दिवसांत कशी होती अवस्था? कथित गर्लफ्रेंडने सांगितलं सारं सत्य )
 

फ्लॉप चित्रपटांची मालिका आणि आर्थिक संकट

2000 च्या दशकाच्या सुरुवातीला अब्बासच्या करिअरला ओहोटी लागली. त्याचे एकापाठोपाठ एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. हळूहळू मुख्य अभिनेत्याच्या भूमिका मिळणे बंद झाले आणि त्याला दुय्यम भूमिकांवर समाधान मानावे लागले.

एका जुन्या मुलाखतीत आपल्या कठीण काळाबद्दल सांगताना तो म्हणाला होता की, चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आर्थिक स्थिती इतकी खालावली होती की घराचे भाडे भरणेही कठीण झाले होते. सुरुवातीला अहंकारापोटी त्याने इतर कामे मागितली नाहीत, पण नंतर निर्माते आर. बी. चौधरी यांच्याकडे काम मागितल्यानंतर त्याला 'पुवेली' चित्रपटात संधी मिळाली. मात्र, सततच्या अपयशामुळे शेवटी त्याने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला.

( नक्की वाचा : Aishwarya Rai: सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर कशी होती ऐश्वर्याची अवस्था? इतक्या वर्षांनी उघड झालं 'ते' भयानक सत्य )

न्यूझीलंडमध्ये टॅक्सी ड्रायव्हर अन् मेकॅनिकचे काम

डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी अब्बासला आपली जमीन आणि फ्लॅट विकावा लागला. अखेर 2015 च्या सुमारास त्याने कुटुंबासह न्यूझीलंडमध्ये स्थलांतर केले. तिथे उदरनिर्वाहासाठी त्याने पेट्रोल पंपावर, कन्स्ट्रक्शन साईटवर, बाईक मेकॅनिक म्हणून आणि रस्त्यांवर टॅक्सी चालवून काम केले.

Advertisement

सध्या काय करतोय अब्बास?

या सर्व संघर्षातून बाहेर पडल्यानंतर अब्बास आता एक 'मोटिव्हेशनल स्पीकर' म्हणून कार्यरत आहे. कोरोना काळात नैराश्याशी झुंजणाऱ्या लोकांसाठी त्याने ऑनलाइन माध्यमातून समुपदेशनाचे काम केले, कारण स्वतः त्यानेही किशोरवयात नैराश्याचा सामना केला होता.

दरम्यान, जवळपास 10 वर्षे अभिनय क्षेत्रापासून दूर राहिल्यानंतर अब्बास आता पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर येण्यास सज्ज झाला आहे. एका तमिळ फॅमिली-कॉमेडी चित्रपटातून तो दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पुनरागमन करत आहे.
 

Advertisement

Topics mentioned in this article