Step inside Ajay Devgn and Kajol's Goa villa: तुम्ही गोव्याला जाण्याचा विचार करत असाल आणि तिथे राहण्यासाठी एखादं आलिशान आणि सुंदर ठिकाण शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. तुम्ही बॉलिवूड स्टार्स अजय देवगण आणि काजोल यांच्या व्हिलामध्ये थांबू शकता. मापुसा म्हणजेच म्हापसा, नॉर्थ गोवा येथे या स्टार्सचा Villa Eterna नावाचा व्हिला आहे. जो सामान्य लोकांसाठीही बुकिंगसाठी उपलब्ध आहे. शहराच्या गर्दीपासून दूर शांत अशा ठिकाणी हा व्हिला आहे. आपल्या सुट्ट्या निवांत घावण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. चला जाणून घेऊया या व्हिलामध्ये काय खास आहे आणि इथे राहण्यासाठी किती खर्च येतो.
या व्हिलाची खास वैशिष्ट्ये काय आहेत?
अजय देवगण आणि काजोल यांचा हा व्हिला पोर्तुगीज स्थापत्यशास्त्र आणि आधुनिक लक्झरीचे एक उत्तम मिश्रण आहे. यात 5 मोठे बेडरूम आहेत. प्रत्येक बेडरूमला संलग्न बाथरूम आहे. एकूण 12 पाहुणे येथे आरामात राहू शकतात. व्हिलामधील मास्टर बेडरूम एका खाजगी बागेत उघडते, ज्यामुळे ते अधिक खास बनतं.
याव्यतिरिक्त, इथे तुम्हाला एक सुंदर स्विमिंग पूल, गजेबो, जकुझी, मोकळं लिव्हिंग आणि डायनिंग एरिया, वॉक-इन शॉवर्स, एंटरटेनमेंट सिस्टीम, योगा डेक, आउटडोअर डायनिंग आणि बारबेक्यू, मोठा लाउंज एरिया आणि कार्यक्रमांसाठी विशेष जागा देखील मिळेल. म्हणजेच, Villa Eterna मध्ये सर्व प्रकारच्या आलिशान सुविधा उपलब्ध आहेत. हा व्हिला नॉर्थ गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांपासून आणि स्थानिक बाजारांपासून खूप जवळ आहे.
एका रात्रीचे भाडे किती आहे?
तुम्ही हा आलिशान व्हिला एका रात्रीसाठी रु. 79,650 मध्ये बुक करू शकता. या शुल्कात कर आणि इतर सर्व शुल्क समाविष्ट आहेत. व्हिलाचे बुकिंग तुम्ही amastaysandtrails.com या वेबसाइटवर करू शकता. हा व्हिला पर्यटकांसाठी खास आहे. तो अशा ठिकाणी आहे की तुमची सुट्टी तो खऱ्या अर्थाने खास बनवतो. शिवाय अजय देवगण आणि कोजोल यांच्या घरात आपण राहीले याचा आनंदही देवून जातो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.