- संजय दत्तचा 'धुरंधर' चित्रपटातील चौधरी असलम खान पात्र सध्या बॉक्स ऑफिसवर मोठा यशस्वी ठरला आहे
- अजय देवगण आणि संजय दत्त यांचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
- साजिद खानच्या टॉक शोमध्ये अजय देवगणने संजय दत्ताचा दारूचा किस्सा सांगितला आहे.
'धुरंधर'च्या यशानंतर संजय दत्त आणि अजय देवगण यांचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. संजय दत्तच्या 'धुरंधर' चित्रपटातील 'चौधरी असलम खान' या पात्राने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 2014 नंतर संजय दत्तला मिळालेल्या या पहिल्या ब्लॉकबस्टर यशाच्या पार्श्वभूमीवर, अजय देवगण आणि संजय दत्त यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. साजिद खानच्या टॉक शोमधील या व्हिडिओत अजयने संजय दत्तच्या दारू पिण्याच्या सवयीवर मिश्किल टिप्पणी केली आहे. त्याला तेवढ्याच दिलदार पणे संजूबाबानेही त्याला प्रतिसाद दिला आहे.
हा मजेशीर किस्सा रात्रीच्या ॲक्शनबाबत होता. शो दरम्यान साजिद खानने विचारले की, "तुमच्या दोघांपैकी उत्तम ॲक्शन कोण करतो?" त्यावर अजय देवगण हसत म्हणाला, "दिवसा मी चांगली ॲक्शन करतो, पण रात्रीच्या वेळी संजय दत्त माझ्यापेक्षा सरस ठरतो." संजय दत्तनेही याला दुजोरा देत म्हटले की, "रात्री 8 ते 9 नंतर माझी ॲक्शन खरोखरच जबरदस्त असते." त्याचा सांगण्याचा अर्थ या वेळात तो मद्यपान करतो. अजय देवगणला ही गोष्ट माहित होती. म्हणूनच त्यांनी या शो मध्ये ती सर्वां समोर सांगीतली.
नक्की वाचा - Ajay Devgn: अजय देवगण दिवसातून किती वेळा दारू घेतो? ब्रँड,वेळ, अन् किंमतही सांगितली
संजू बाबाच्या चालण्याच्या स्टाईलवर ही अजय देवगणने यावेळी चिमटे घेतले. संजय दत्तच्या विशिष्ट चालण्याच्या पद्धतीवर (वॉक) चर्चा रंगली होती. यावर संजय दत्त म्हणाला की कदाचित जन्मापासूनच आपण असे चालत असू. मात्र, अजय देवगणने लगेच फिरकी घेत विचारले, "तुम्ही कधी संजयची 'खरी' चाल पाहिली आहे का? जेव्हा तो पूर्णपणे शुद्धीत असतो, तेव्हाच तो खरा वॉक करतो." अजयच्या या विधानामुळे सेटवर एकच हशा पिकला. संजय दत्तने ही या फिरकीची मजा घेत अजय देवगणच्या या टोलेबाजीला दिलखूलास दाद दिली.
अजय देवगणने ही एका मुलाखतीत आपण वयाच्या 14 व्या वर्षी दारू पिण्यास सुरूवात केली होती असं सांगितलं होतं. त्यानंतर ती सवय झाली. पण त्यावर आपण मात केल्याचं ही त्याने सांगितलं. आता दारूचे सेवन ते 'नशा' म्हणून नव्हे, तर 'रिलॅक्सेशन रिचुअल' म्हणून करतात असंही त्याने स्पष्ट केलं होतं. अजय फक्त 30ml माल्ट कधीकधी दोन पेग घेतात. ज्यामुळे त्यांना दिवसाच्या थकव्यानंतर शांतता मिळते. ते जी दारू घेतात त्याचे नाव प्रीमियम माल्ट असे आहे. त्याची एक बॉटल 60,000 रुपयांपर्यंत मिळते.