Ajay Devgn: अजय देवगण दिवसातून किती वेळा दारू घेतो? ब्रँड,वेळ, अन् किंमतही सांगितली

मित्रांच्या सांगण्यावरून वयाच्या 14 व्या वर्षी पहिल्यांदा दारूचा ग्लास उचलल्याचे अजय यांनी सांगितले.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

बॉलिवूडमधील शांत आणि तेवढाच गंभीर अभिनेत्यांमध्ये अजय देवगण यांचे नाव अग्रस्थानी आहे. पडद्यावर जितके शिस्तबद्ध, तितकाच तो वैयक्तिक आयुष्यातही गंभीर असल्याचे मानले जाते. मात्र, नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक मोठा आणि धक्कादायक सत्य उघड केले आहे. अजय देवगण यांने कबूल केले की, एकेकाळी त्याला दारूचे व्यसन होते. या सवयीची सुरुवात अवघ्या 14 वर्षांच्या वयात झाली होती. त्यानंतर ती सवय व्यसनात बदलली. मजा म्हणून सुरू केलेली दारू नियमित झाली असं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे. 

नक्की वाचा - बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीने पाळली गाय, वासरासोबत योग करतानाचा Video आला समोर

सुरुवातीला 'ट्राय' केले, नंतर बनले व्यसन
मित्रांच्या सांगण्यावरून वयाच्या 14 व्या वर्षी पहिल्यांदा दारूचा ग्लास उचलल्याचे अजय यांनी सांगितले. त्यांना वाटले होते की ही फक्त एकदा घेण्या पुरताच मर्यादीत आहे. एकदा घेतली की विषय संपेल. पण तसे झाले नाही. ती एकदा घेण्याची गोष्ट राहीली नाही.  पण हळूहळू त्याचे रूपांतर एका वाईट सवयीत झाले. असे ते सांगितात. पुढे ते म्हणतात, "मी खूप प्यायचो, हे मी लपवत नाही. अनेकवेळा सोडण्याचा प्रयत्न केला, पण व्यसन सोडणे सोपे नव्हते," असे अजय यांनी स्पष्ट केले. व्यसन लागणे किती सोपे आहे आणि ते सोडणे किती कठीण, याचा अनुभव त्यांनी या काळात घेतला असं ही त्यांनी सांगितलं.

नक्की वाचा - या लहान मुलीने दिले आहेत 3 हिट सिनेमे, OTT वर ही तिची जादू, वडिल प्रसिद्ध अभिनेते तर भाऊ...

आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय
एक वेळ अशी आली, जेव्हा आपल्याला आता थांबणे आवश्यक आहे, हे अजय यांना जाणवले. यानंतर त्यांनी स्वतःला नियंत्रित करण्यासाठी 'वेलनेस स्पा' जॉईन केला.  त्यावेळी दारूचे सेवन पूर्णपणे थांबवले. या निर्णयाने त्यांचे आयुष्य बदलून टाकले. आता दारूचे सेवन ते 'नशा' म्हणून नव्हे, तर 'रिलॅक्सेशन रिचुअल' म्हणून करतात.  ते फक्त 30ml माल्ट कधीकधी दोन पेग घेतात. ज्यामुळे त्यांना दिवसाच्या थकव्यानंतर शांतता मिळते. ते जी दारू घेतात त्याचे नाव प्रीमियम माल्ट असे आहे. त्याची एक बॉटल 60,000 रुपयांपर्यंत मिळते. 
 

Advertisement