Alia bhatt: रणबीरपेक्षा आलिया भट्टची कमाई जास्त, एकूण संपत्ती जाणून तुम्हाला बसेल धक्का!

आलिया भट्टच्या नावावर वांद्रे येथे 32 कोटी रुपयांचा बंगला आहे. याव्यतिरिक्त...

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

बॉलिवूडमधील सर्वात चर्चित जोडी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ही आहे. हे दोघांची गणना बॉलिवूडमधल्या यशस्वी कलाकारांमध्ये होते. बॉक्स ऑफिसवरील त्यांचे यश आणि चाहत्यांमधील लोकप्रियता यामुळे ते स्वतःच एक ब्रँड बनले आहेत. दोन्ही स्टार त्यांच्या चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट आणि गुंतवणुकीतून वैयक्तिकरित्या शेकडो कोटी रुपयांचे मालक आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की दोघांपैकी कोणाची नेटवर्थ जास्त आहे? चला जाणून घेऊया.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

2021 मध्ये आलियाची एकूण संपत्ती 517 कोटी रुपये होती. या तुलनेत डफ अँड फेल्प्सनुसार रणबीरची एकूण संपत्ती गेल्या वर्षी 203 कोटी रुपये होती. उद्योग क्षेत्रातील सूत्रांनुसार, तेव्हापासून दोघांच्या कमाईत वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती 720 कोटी रुपये झाली आहे.

ट्रेंडिंग बातमी - IPL 2025 Final: जर पावसामुळे सामना रद्द झाला, तर कोण ठरणार चॅम्पियन? नियम काय सांगतात?

उद्योग क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे की, आलिया सध्या एका प्रोजेक्टसाठी 15-18 कोटी रुपये घेते. आर्थिक सल्लागार संस्था डफ अँड फेल्प्सने तिला 2021 मध्ये आलियाला सर्वात महागडी सेलिब्रेटी म्हटलं होतं. ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांच्या मते आलीयाचा मोठा चाहता वर्ग आहे. क्वालिटी वॉल्स कॉर्नटो, लेज, फ्रूटी, ड्यूरोफ्लेक्स, कॅडबरी आणि फ्लिपकार्ट यांसारख्या ब्रँड्सनी तिला आपला ब्रँड ॲम्बेसेडर बनवले आहे. असे म्हटले जाते की ती एका एंडोर्समेंट शूटसाठी दररोज सुमारे 2 कोटी रुपये घेते.

ट्रेंडिंग बातमी - Raigad News: नॅपकिनवरून राजकारण पेटलं, तटकरेंना थेट वेटर म्हटलं, गोगावलेंची आरपारची भाषा

आलिया भट्टच्या नावावर वांद्रे येथे 32 कोटी रुपयांचा बंगला आहे. याव्यतिरिक्त तिच्या नवीन प्रॉडक्शन कंपनी 'इटरनल सनशाईन प्रॉडक्शन्स'साठी ऑफिस तिने ऑफीस खरेदी केली आहे. त्याची किंमत 2 कोटी रुपये आहे. लंडनमध्येही तिचे एक घर आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग ज्याची किंमत 2 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. बीएमडब्ल्यू 7 सीरीज त्याची किंमत 1.76 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तर रणबीर प्रत्येक चित्रपटासाठी 50 कोटी रुपये घेतो, असं सुत्रांचं म्हणण आहे. त्यानुसार आलियापेक्षा जवळपास तिप्पट जास्त पैसे रणबीर घेत आहे. तो ओप्पो, टाटा एआयजी, कोका-कोला आणि ओरियो यांसारख्या अनेक मोठ्या ब्रँड्सची जाहीरात करतो. तो या ब्रँडच्या शूटसाठी  6 कोटी रुपये घेतो.

Advertisement