हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेल्या 'मिस्टर इंडिया' (1987) या चित्रपटाला 25 मे रोजी अनेक वर्षे पूर्ण झाली आहेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या या क्लासिक चित्रपटातील 'मोगँबो' हा व्हिलन आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. अमरीश पुरी यांनी ही भूमिका अजरामर केली. पण तुम्हाला माहीत आहे का, या भूमिकेसाठी अमरीश पुरी हे निर्मात्यांची पहिली पसंती नव्हते. या भूमिकेसाठी आधी अनुपम खेर यांची निवड करण्यात आली होती.
विशेष म्हणजे अनुपम खेर यांनी स्क्रीन टेस्ट ही झाली होती. त्यानंतर काही दिवस शूटिंगही केले होते. मात्र, त्यांचा लुक स्कॅरी वाटण्याऐवजी विनोदी वाटू लागल्याने शेखर कपूर यांनी त्यांना बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शेखर कपूर यांनी अमरीश पुरी यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी पुरी 'लोहा' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. बोनी कपूर आणि शेखर कपूर यांनी त्यांची ऊटी येथे भेट घेऊन त्यांना या रोलसाठी तयार केले. या चित्रपटासाठी अमरीश पुरी यांना तब्बल 1 करोड रुपयांचे मानधन देण्यात आले होते.
ज्यामुळे ते त्या काळातील सर्वात महागडे व्हिलन ठरले. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट केवळ 3.8 करोड रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला होता. त्याने बॉक्स ऑफिसवर 10 करोड रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवला होता. हा त्यावेळचा रेकॉर्डब्रेक गल्ला होता. विशेष म्हणजे, बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक जोडी सलीम-जावेद यांचा हा एकत्र लिहिलेला शेवटचा चित्रपट होता. 1982 मध्येच या जोडीमध्ये फूट पडली होती. पण त्यांनी आधीच लिहलेली ही स्क्रिप्ट 'मिस्टर इंडिया'च्या रूपाने पडद्यावर आली. या चित्रपटानंतर दोघांनी अधिकृतपणे आपले मार्ग वेगळे केले.
बॉलिवूडचा सर्वात खतरनाक व्हिलन म्हणून 'मोगॅंबो' आज ही घराघरात ओळखला जातो. 'मिस्टर इंडिया' चित्रपटाला 25 मे रोजी प्रदर्शित होऊन मोठा काळ लोटला असला, तरी अमरीश पुरी यांचा 'मोगॅंबो खुश हुआ' हा डायलॉग आजही लोकांच्या जिभेवर आहे. पण, या आयकॉनिक रोलशी जोडलेला एक रंजक इतिहास समोर आला आहे. आयएमडीबीच्या रिपोर्टनुसार, या भूमिकेसाठी आधी अनुपम खेर यांना साईन करण्यात आले होते. अनुपम खेर यांनी काही सीन शूटही केले होते, पण त्यांचा लुक मोगँबोच्या क्रूरतेचा फील देऊ शकला नाही. दिग्दर्शकाला मोगँबोच्या रूपात एक घाबरवणारा चेहरा हवा होता. म्हणून अनुपम खेर यांना या प्रोजेक्टमधून बाहेर पडावे लागले.