बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरूख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन (Aryan Khan) हा क्रूझवरील पार्टीमुळे वादात सापडला होता. क्रूझवर छापा पडला त्यात अंमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली आर्यन खानला अटक करण्यात आली होती. बरेच दिवस आर्यन खान तुरुंगात होता. आर्थर रोड तुरुंगात (Arthur Road Jail) त्याला ठेवण्यात आलं होतं. अखेर आर्यन खान याची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. याच प्रकरणामध्ये अभिनेता चंकी पांडेची मुलगी आणि अभिनेत्री अनन्या हिचीदेखील एनसीबीने चौकशी केली होती. आर्यन खान आणि अनन्या या दोघांमध्ये व्हॉटसअपवरून चॅट झालं होतं, या चॅटमुळेच अनन्याचीही चौकशी करण्यात आली होती.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अनन्या ही आर्यन खान याची मैत्रीण आहे. अनन्याची आर्यनची बहीण सुहाना हिच्याशीही घट्ट मैत्री आहे, या दोघी लहानपणापासून मैत्रिणी आहेत. या दोघी अनेकदा एकत्र फिरायला जातात आणि दोघींना एकत्र फिरताना अनेकदा पाहायला मिळालं होतं. अनन्याची नवी वेबसिरीज CTRL प्रसिद्ध झाली असून या वेबसिरीजच्या प्रमोशनदरम्यान तिने आर्यन खान हा तिला खासगी व्हिडीओ लीक करण्याची धमकी देत होता असा खुलासा केला. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.