Annu Kapoor Interview : दाक्षिणात्य चित्रपटांपासून हिंदी चित्रपटांपर्यंत आपला अभिनय आणि नृत्याने चाहत्यांची हृदय काबीज करणारी तमन्ना भाटिया सध्या चित्रपटांतील गाणी आणि त्यातील डान्ससाठी चर्चेत आहे. आर्यन खान दिग्दर्शित वेब सीरिज बॅड्स ऑफ बॉलिवूडमधील गफूर गाण्यातील तिचा अदाकारी असो की स्त्री २ मधील 'आज की रात' गाणं असो. दोन्ही गाणं चाहत्यांकडून पसंत केलं जात आहे.
तमन्ना भाटियाचं आज की रात हे गाणं खूप प्रसिद्ध झालं. लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत कोटींमध्ये याचे रिल्स झाले. या गाण्यावर अभिनेता अन्नू कपूर यांनी अत्यंत आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली आहे. ज्यानंतर 69 वर्षीय अन्नू कपूर यांना नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.
तमन्ना भाटियाच्या शरीरावर आक्षेपार्ह कमेंट..
अन्नू कपूर म्हणाले, माशाअल्लाह तमन्ना भाटियाचं शरीर दुधाळ आहे. (दुधिया बदन) तमन्ना भाटिया यांनी एक मुलाखतीत सांगितलं होतं की, अनेक महिलांनी त्यांना सांगितलं होतं की, आज की रात हे गाणं पाहिल्याशिवाय त्यांची लहान मुलं झोपत नाहीत. अन्नू कपूरच्या मुलाखतीदरम्यान त्यांनी यावरही आक्षेपार्ह कमेंट केली. ते म्हणाले, तमन्नाचं गाणं पाहिल्याशिवाय कोणत्या वयातील मुलांना झोप येत नाही? मी असतो तर त्यांना हे विचारलं असतं. 70 वर्षांच्या मुलालाही झोप येत नाही का? तमन्ना भाटिया हिचं गाणं, शरीरामुळे आमच्या मुलांना चांगली झोप येत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या आणखी काही इच्छा, आकांक्षा असतील तर देव ती पुर्ण करो असा मी त्यांना आशीर्वाद देतो.
त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केला जात आहे. एका वापरकर्त्याने लिहिलंय की, अशा माणसांमुळे वृद्धांकडून आशीर्वाद घ्यायला मुली घाबरतात. याचमुळे प्रियांका चोप्राने अन्नू कपूरसोबत सात खून माफ या चित्रपटात सीन करायला नकार दिला असेल.