April May 99: मैत्रीची परिभाषा अन् बालपणीचा अविस्मरणीय अनुभव! ‘एप्रिल मे ९९' चित्रपटाची वेड लावणारी कथा!

काय आहे नेमकी या चित्रपटाची अनोखी कथा? याबाबतच जोगेश भुतानी यांनी एनडीटीव्हीशी गप्पा मारल्या. ज्यामध्ये त्यांनी या चित्रपटाची वेड लावणारी कथा उलगडून सांगितली.

जाहिरात
Read Time: 2 mins

April May 99 Movie: 90 ची गाणी, 90 चे चित्रपट , 90 ची लाईफस्टाईल अन् 90 चा काळ म्हणजे गोल्डन एरा असं आपण अनेकदा म्हणतो. 90 चा काळ जगलेली पिढी म्हणजे सर्वात नशीबवान अन् आजच्या बदलत्या काळाचे साक्षीदार म्हणून 90 च्या तरुणाईकडे पाहिले जाते. याच सुवर्ण काळाची मजा, मस्ती अन् अनुभव मांडणारा चित्रपट म्हणजे एप्रिल मे 99.. मे महिन्यात आलेल्या या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश:वेड लावलं. विशेष म्हणजे मैत्रीचा अनोखा धडा शिकवणाऱ्या या मराठी चित्रपटाचे निर्माते जोगेश भुतानी हे हिंदी आहेत. काय आहे नेमकी या चित्रपटाची अनोखी कथा? याबाबतच जोगेश भुतानी यांनी एनडीटीव्हीशी गप्पा मारल्या. ज्यामध्ये त्यांनी या चित्रपटाची वेड लावणारी कथा उलगडून सांगितली.

बालपणीचे दिवस अन् उन्हाळ्याच्या सुट्यांची सुंदर कथा!

बालपणी एप्रिल मे महिन्यात शाळांना सुट्टी लागली की ओढ लागायची ती मामाच्या गावी जायची. मामाच्या गावी जाऊन मजामस्ती, धमाल, नव्या मित्रांसोबत घालवलेले अविस्मरणीय क्षण प्रत्येकालाच आठवत असतील. याच उन्हाळ्याच्या सुट्टीची आणि बालपणातील गोड मैत्रीची आठवण करून देणारा चित्रपट म्हणजे  ‘एप्रिल मे ९९'. बालपणातील आठवणी जागवणारा, पुन्हा एकदा त्या सुवर्णकाळात घेऊन जाणारा अन् भरभरुन आनंद देणारा, खिळवून ठेवणारा असा हा सिनेमा १६ मे रोजी प्रदर्शित झाला.

Advertisement

 चार मित्रांची दोस्ती अन् गावाकडच्या गोष्टी!

कृष्णा, प्रसाद, सिद्धेश, आणि जाई या चमुंच्या बालपणीची, उन्हाळ्याच्या सुट्टीची गोष्ट. उत्तम इंग्रजी येत असलेल्या जाईकडून इंग्रजी शिकण्यासाठी हे तिनही मित्र तिच्याशी मैत्री करतात. त्यांचे पालकही त्यांना तुम्ही जाईला आपलं गाव दाखवा, त्यानिमित्तानं तिच्याकडून तुम्ही इंग्रजी शिकाल' असं सांगतात. कृष्णा, प्रसाद, सिद्धेश या मैत्रिच्या मैत्रीच्या त्रिकूटाचे जाईच्या एन्ट्रीने 'चौकोना'त रुपांतर  झालं. इथूनच या गँगची सुंदर कथा उलघडत जाते. त्यांच्या मैत्रीची गोष्ट पाहता पाहता प्रेक्षक कधी स्वत:च्या बालपणीत हरवून जातो, हे समजतही नाही, अशी या चित्रपटाची कथा एकंदरित कथा.

Advertisement

जोगेश भुतानी काय म्हणाले?

"मला या चित्रपटाची कथा आवडली अन् मी हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला असं त्यांनी सांगितले. आजच्या इंटरनेच्या काळात हा चित्रपट तुम्हाला तुमचे बालपणीचे जीवन पुन्हा नव्याने आठवायला भाग पडतो. मी सुद्धा अशाच बालपणाच्या आठवणी जगलो आहे. आजच्या मोबाईलच्या, इंटरनेटच्या विश्वात आपले मित्र जपणं, या सुंदर आठवणी जगणं किती महत्त्वाचं आहे हेच हा चित्रपट दाखवतो. त्यामुळे हा चित्रपट नक्की पाहावा,"  असं आवाहनही त्यांनी केले.

Topics mentioned in this article