Asrani Last Wish: 'मेरी मौत के बाद...' असरानी यांची शेवटची इच्छा... कुटुंबीयांनी केली शांतपणे पूर्ण

Asrani Last Wish: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि लाडके अभिनेते तथा हास्यसम्राट गोवर्धन असरानी यांचे सोमवारी  (20 ऑक्टोबर) निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
Asrani Last Wish: असरानी यांच्या पत्नी मंजू यांनी याबाबत माहिती दिली.
मुंबई:

Asrani Last Wish: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि लाडके अभिनेते तथा हास्यसम्राट गोवर्धन असरानी यांचे सोमवारी  (20 ऑक्टोबर) निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. प्रकृतीच्या तक्रारीमुळे त्यांना सुमारे 5 दिवसांपूर्वी मुंबईतील जुहू येथील आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फुफ्फुसांमध्ये पाणी (Lung Congestion) झाल्याने त्यांची प्रकृती बिघडत गेली, अशी माहिती आहे.

दिवाळीच्या रात्री ही दुःखद बातमी समोर आल्याने त्यांचे चाहते आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

साधेपणाने अंतिम यात्रा

असरानी यांच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी नेहमी साधेपणाने जगावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी त्यांची पत्नी मंजू यांना स्पष्ट सांगितले होते की, ‘माझ्या मृत्यूनंतर कोणताही सार्वजनिक समारंभ किंवा मीडियाची गर्दी नको.'

त्यांच्या याच शेवटच्या इच्छेचा मान ठेवत, कुटुंबाने त्यांचा अंतिम संस्कार अत्यंत खासगी ठेवला. सोमवारी सायंकाळी सांताक्रुझ स्मशानभूमीत अत्यंत शांत वातावरणात आणि केवळ कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्यांच्या निधनाची बातमी सार्वजनिक करण्यात आली.

( Asrani Passed Away: 'अंग्रेज़ों के ज़माने का जेलर' हरपला! ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा )
 

निधनापूर्वीचा 'तो' संदेश

दुर्दैवाची बाब म्हणजे, मृत्यूच्या काही तास आधीच असरानी यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर चाहत्यांना 'हॅप्पी दिवाली' म्हणत शुभेच्छा दिल्या होत्या. नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीबद्दल अनेक खोट्या अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे अनेक लोकांनी त्यांच्या निधनाची बातमी देखील खोटी समजली. मात्र, चाहत्यांनी जेव्हा त्यांचे अधिकृत सोशल मीडिया खाते पाहिले, तेव्हा त्यांना ही हृदयद्रावक सत्यता कळली.

Advertisement

5 दशकांचा शानदार प्रवास

असरानी हे हिंदी सिनेमातील सर्वात जास्त प्रेम मिळवलेल्या हास्य कलाकारांपैकी एक होते. त्यांच्या 50 वर्षांहून अधिकच्या शानदार कारकिर्दीत त्यांनी 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मधून शिक्षण पूर्ण केले आणि 1960 च्या दशकाच्या मध्यात चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सुरुवातीला त्यांनी गंभीर भूमिका केल्या, पण लवकरच त्यांच्या अचूक 'कॉमिक टायमिंग'मुळे त्यांना एक खास ओळख मिळाली. 1970 आणि 1980 च्या दशकात ते घराघरात पोहोचले. 

चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार येतील आणि जातील, पण असरानी यांची जागा भरून काढणे हे कुणालाही शक्य नाही.
 

Topics mentioned in this article