Bad Newz Box Office Collection Day 1: 'सरफिरा' साठी 'बॅड न्यूज', अक्षय कुमारच्या चाहत्यांचे डोके फिरले

Bad Newz Box Office Collection Day 1: बैड न्यूज के पहले दिन का बॉक्स ऑफिस कलेक्शन सामने आ गया है. जिसमें विक्की कौशल और तृप्ति डिमरी की फिल्म ने अक्षय कुमार की सरफिरा से ज्यादा कमाई कर डाली है.

जाहिरात
Read Time: 2 mins
Bad Newz Box Office Collection Day 1
मुंबई:

विकी कौशल, तृप्ती डिमरी, एमी विर्क आणि नेहा धुपिया यांचा बॅड न्यूज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटाची बरीच चर्चा होती कारण 'बॅड न्यू'जचा ट्रेलर प्रेक्षकांना आवडला होता. विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांची भूमिका असलेला या चित्रपटाचे आगाऊ बुकिंगही दणक्यात झाले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने पहिल्या दिवशी केलेल्या कमाईचे आकडे स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. विकी कौशल आणि तृप्ती डिमरीची भूमिका असलेल्या या चित्रपटाने अक्षय कुमारच्या 'सरफिरा'पेक्षा जास्त कमाई केली असल्याचा अंदाज आहे.

आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, 'बॅड न्यूज'ने पहिल्या दिवशी 6 ते 8 कोटी रुपयांची कमाई केली असल्याची शक्यता आहे. अंतिम आकडा अद्याप हाती येणे बाकी आहे, मात्र तृप्ती डिमरी, विकी कौशल आणि एमी विर्क यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बॅड न्यूज चित्रपटाने, अक्षय कुमारच्या 'सरफिरा'पेक्षा जास्त मोठी ओपनिंग केली आहे. सरफिराने पहिल्या दिवशी 2.50 कोटींची कमाई केली होती. बॅड न्यूज चित्रपट 80 कोटी रुपये खर्चून बनविण्यात आला असून या चित्रपटात विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क हे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. 

अॅनिमल या चित्रपटानंतर तृप्ती डिमरी ही रातोरात प्रसिद्ध झाली होती आणि तिची चित्रपटसृष्टीतील मागणी वाढली आहे. तृप्तीच्या वाट्याला अनेक चांगले चित्रपट आले असून बॅड न्यूज हा त्यापैकीच एक आहे. 2019 साली 'गुड न्यूज' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात  करीना कपूर खान, दिलजीत दोसांझ, अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांची प्रमुख भूमिका होती. 'बॅड न्यूज' गुड न्यूज चित्रपटाचा सिक्वेल असून या चित्रपटाने अक्षय कुमारच्याच 'सिरफिरा'ला पाठी टाकल्याचे दिसते आहे. 

Advertisement