Big Boss Marathi 6 Ayush Sanjeev Omkar Raut Fighting: बिग बॉस मराठीचा सहावा सिझन सध्या चांगलाच गाजत आहे. गेल्या दोन आठवड्यापासून बिग बॉसच्या घरात धक्क्यामागून धक्के अन् नवनवे ट्वीस्ट येत आहेत. या विकेंडला बिग बॉसने मोठा निर्णय घेत एकाचवेळी दोघांना बाहेरचा रस्ता दाखवला. रविवारी आयुष संजीव आणि करण सोनवणे घराबाहेर पडले. त्याआधी ओमकार राऊतही घराबाहेर पडला होता. अशातच आता घराबाहेर पडताच आयुष संजीव आणि ओमकार राऊतमध्ये राडा झाल्याचा एक कथित व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
घराबाहेर पडताच आयुष अन् ओमकार भिडले
मराठी बिग बॉस ६ ची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. सोशल मीडियावर बिग बॉसच्या घरात घडणाऱ्या अनेक घटनांचे व्हिडिओ, विश्लेषण तसेच खिल्ली उडवणारे कंटेट पाहायला मिळतात. सध्या अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये बिग बॉसच्या घरातून नुकतेच बाहेर पडलेले आयुष संजीव आणि ओमकार राऊत मारामारी करताना दिसत आहेत. मला नॉमिनेट का केलं? म्हणत दोघांमध्ये जुंपल्याचे दिसत आहे.
हा व्हिडिओ निक शिंदे या कंटेट क्रिएटरने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, निक शिंदे अन् त्याचे मित्र बिग बॉस मराठीचा कालचा एपिसोड पाहत आहेत. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख हे आज घरातून कोण बाहेर पडणार याबाबत घोषणा करणार असतात. यावेळीच घराबाहेर कोण पडेल? यावरुन या मुलांमध्ये चर्चा सुरु असते. एलिमिनेशनमध्ये आयुष, सचिन कुमावत आणि करण सोनवणे यांपैकी कोण घराबाहेर जाईल? यावर ते बोलत असतात.
व्हिडिओ होतोय व्हायरल
सचिन कुमावत किंवा करण सोनवणे घराबाहेर जाईल पण आयुष घराबाहेर पडेल असं मला वाटत नाही, असं त्यापैकी एकजण सांगतो. इतक्यात त्यांच्या मागून आयुष संजीव येतो अन् खांद्यावर हात ठेऊन मलाही सचिन घराबाहेर जाईल असं म्हणतो. आयुषला पाहून सर्वच मुले दचकतात. इतक्यात त्याठिकाणी ओमकार राऊतही येतो अन् आयुषची कॉलर पकडतो. मला नॉमिनेट करतो का रे, मला मला नॉमिनेट करतो का रे, तुझ्या तर आईची असं म्हणत ओमकार त्याच्या अंगावर धावून जातो.
हा प्रकार पाहून सगळेच घाबरुन जातात. अर्थातच ही भांडणे, मारहाण काही खरी नाही. हा फक्त एक रीलचा भाग आहे. मात्र सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, बिग बॉसच्या घरात सध्या एकापेक्षा एक अतरंगी स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसत आहेत. तन्वी कोलते, रुचिता जामदार, दिपाली सय्यद, सचिन कुमावत या स्पर्धकांमध्ये जोरदार जुगलबंदी पाहायला मिळत आहे.
Drishyam 3 : क्राईम थ्रिलर, सस्पेन्स अन् श्वास रोखून धरणारी कहाणी...या तारखेला रिलीज होणार ‘दृश्यम 3