Bigg Boss 19 Contestent: सलमान खानच्या प्रसिद्ध रियॅलिटी शो बिग बॉस 19 चं प्रीमियर झालं आहे. नेहमीप्रमाणे यंदाही शोमध्ये वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांनी भाग घेतला आहे. यंदाच्या यादीत टॉप सीरियलच्या अभिनेत्यांपासून प्रसिद्ध युट्यूबरच्या नावांचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला या शोमधील स्पर्धकांची नावं सांगणार आहोत, ज्यांचा खेळ आजपासून सुरू होईल.
गौरव खन्नाचा प्रोमो कलर्स टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये त्याचा चेहरा ओळखला येत नसला तरी चाहत्यांनी त्याला ओळखलं आहे. गौरव खन्नाने हा अनुपम मालिकेतील अनुज कपाडियाच्या भूमिका निभावली आहे. नुकतच त्याने सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया जिंकला आहे.
टीव्ही अभिनेत्री अशनूर कौर हिचं नावही बिग बॉस 19 च्या यादीत सामील असल्याचं सांगितलं जात आहे. ती वयाच्या पाच वर्षापासून अभिनय क्षेत्रात आहे. 'ना बोले तुम ना मैंने कुछ कहा', 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'पटियाला बेब्स' मधील आपल्या भूमिकेसाठी ती प्रसिद्ध आहे.
गौहर खानचा मेहुणा आवेज दरबार हा एक लोकप्रिय कोरिओग्राफर, डान्सर, इन्फ्लुएंसर आणि युट्यूबर आहे. आवेज हा इस्माईल दरबारचा मुलगा असून टिकटॉक डान्स व्हिडिओमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. त्याचे इंस्टाग्राम आणि युट्यूबवर लाखो फॉलोअर्स आहेत.
नगमा मिराजकर ही मुंबईतील डिजिटल क्रिएटर आहे. तिने मेबेलिन आणि अॅमेझोनसारख्या ब्रँडसह काम केलं आहे. तिने लंडन फॅशन विकमध्ये रॅम्प केलं आहे.
मॉडल-अभिनेत्री बसीर अली एमटीवी स्प्लिट्सविला 10ची विजेती आहे. तो रोडीज राइजिंग आणि ऐस ऑफ़ स्पेस 2 मध्ये रनरअप होती. तिने कुंडली भाग्य मालिकेत शौर्याची भूमिका साकारली होती.
कॉमेडियन, आरजे आणि कंटेंट क्रिएटर प्रणित मोरेने सेल्स आणि रेडियोच्या माध्यमातून कॉमेडी कार्यक्रम, स्टँड अपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तो सोलो शो "बाप को मत सिखा" आणि "बँक बेंचर" ,सारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो.
ज्येष्ठ अभिनेत्री कुनिका सदानंद देखील या शोचा भाग असल्याच्या बातम्या आहेत. तिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात "कब्रिस्तान" (१९८८) पासून केली. तिने "बेटा" आणि "गुमराह" सारख्या ११० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
संगीतकार, गायक, निर्माता आणि गीतकार अमल मलिक याने जय हो (२०१४) पासून सुरुवात केली. त्यांना एमएस धोन" आणि "कबीर सिंग" द्वारे लोकप्रियता मिळाली. तो अरमान मलिकचा मोठा भाऊ आहे.
भारतीय लेख-अभिनेता-दिग्दर्शक आणि निर्माता जीशाद कादरीही शोचा भाग होणार आहेत. त्यांनी गँग्स ऑफ वासेपूर (२०१२) चं सहलेखन केलं. डेफिनिटमध्ये अभिनय केलं आणि त्यानंतर मेरठिया गँगस्टरचं दिग्दर्शन केलं.
अभिनेता आणि मॉडेल अभिषेक बजाज यांची अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात परवरिशसारख्या मालिकेपासून झाली, ज्यानंतर त्याने चित्रपटात एन्ट्री घेतली. त्याचा बॉलिवूड डेब्यू स्टूडंट ऑफ द इयर- 2 पासून झाला. तो 'चंडीगढ करे आशिकी' आणि 'बबली बाऊंसर' चित्रपटातही झळकला आहे.
भोजपुरी अभिनेत्री नीलम गिरीने बाबुल (2021) चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तिला "धक-धक गर्ल" च्या रुपात प्रसिद्धी मिळाली आहे.
युट्यूबर आणि अभिनेता मृदुल तिवारी आपल्या युट्यूब चॅनलसाठी प्रसिद्ध आहे. ते कॉमेजी स्केच तयार करतात आणि त्यांना लाखोंचे सबस्क्रायबर आहेत.
नतालिया जेनोसजेक
नेहल छुदासामा
फरहाना भट्ट