IPL मॅचनंतर शाहरुख खान हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांनी दिलं तब्येतीचं अपडेट

Shah Rukh Khan admitted to Ahmedabad's KD Hospital :  अभिनेता आणि कोलकाता नाईट रायडर्स या आयपीएल टीमचा मालक शाहरुख खानला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Advertisement
Read Time: 1 min
अहमदाबाद:

Shah Rukh Khan admitted to Ahmedabad's KD Hospital :  अभिनेता आणि कोलकाता नाईट रायडर्स या आयपीएल टीमचा मालक शाहरुख खानला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यातील क्वालिफायर सामन्यासाठी शाहरुख अहमदाबादमध्ये आला होता.  अहमदाबादमधील हिट स्ट्रोकचा त्रास जाणवल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यानंतर शाहरुख खानला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं 

 

शाहरुख खानला डिहायड्रेशनचा त्रास जाणवत होता. त्याला विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मंगळवारी झालेल्या आयपीएलच्या क्वालिफायर 1 सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादचा 8 विकेट्सनं मोठा पराभव करत आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केलाय. या सामन्याला शाहरुख खान त्याची मुला अबराम आणि सुहानासह उपस्थित होता. 

शाहरुख खानच्या चित्रपट कारकिर्दीसाठी 2023 हे वर्ष चांगलंच यशस्वी ठरलं. पठाण, जवान आणि डंकी हे तीन चित्रपट मागच्या वर्षी शाहरुखचे प्रदर्शित झाले होते. या तीन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

Advertisement