Parineeti Chopra : सध्या दिवाळीचा माहोल आहे. बॉलिवूडमध्येही ठिकठिकाणी दिवाळी पार्टी सुरू आहेत. यादरम्यान एका अभिनेत्रीच्या घरात दिवाळीनिमित्त डबल धमाका पाहायला मिळणार आहे. चोप्रा आणि चड्डा कुटुंबासाठी यंदाची दिवाळी दुप्पट आनंद घेऊन येणार आहे. लवकरच त्यांच्या घरात पाळणा हलणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा डिलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल झाली आहे. राघव चड्डादेखील तिच्यासोबत आहे. अभिनेत्री कोणत्याही क्षणी गुड न्यूज देऊ शकते.
कुटुंबात आनंदाचं वातावरण...
सध्या परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. एकीकडे दिवाळीचा आनंद तर दुसरीकडे नव्या बाळाचं आगमन. दोन्ही कुटुंबात आनंद पसरला आहे. आणि ते बाळ आणि परिणीती सुखरुप घरी लवकर यावेत यासाठी प्रार्थना करीत आहेत. आज तकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
परिणीती चोप्राने २५ ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत ही आनंदाची बातमी दिली होती. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने एका केकचा फोटो शेअर केला होता. यामध्ये लिहिलं होतं, 1+1=3 आणि खाली लहान बाळाच्या पायाचे ठसे होते. प्रेग्नेंट असतानाही परिणीती सोशल मीडियावर सक्रीय होती. ती आपल्या आयुष्यातील घडमोडी चाहत्यांसोबत शेअर करीत होती.
दोन वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकले...
परिणीती आणि राघव चड्डा यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २०२३ मध्ये लग्न केलं. राजस्थानच्या उदयपूरमध्ये त्यांचा लग्नसोहळा बरेच दिवस चालला. लग्नाच्या दोन वर्षांनंतर परिणीती आता आई होणार आहे.