Shraddha Kapoor Rumoured Boyfriend : बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये श्रद्धा कपूरचा समावेश होतो. 'आशिकी 2' मधून कारकिर्द सुुरु करणाऱ्या या 'स्त्री' चे असंख्य फॅन्स आहेत. त्यांना नेहमीच श्रद्धा काय करत असते, याची उत्सुकता असते.
श्रद्धा कपूरचं नाव यापूर्वी वेगवेगळ्या व्यक्तींशी जोडण्यात आलं आहे. आदित्य रॉय कपूरसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती, अशी चर्चा आहे. त्यानंतर तिचं नाव सेलिब्रेटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठबरोबरही तिच्या रिलेशनशिपची चर्चा होती. आता त्यानंतर श्रद्धा एका चित्रपट लेखकासोबत डेट करत असल्याची चर्चा आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
श्रद्धाच्या मोबाईल वॉलपेपरवर कुणाचा फोटो?
श्रद्धा कपूर सध्या कुणाच्या रिलेशनशिपमध्ये आहे त्याचं रहस्य तिच्या फोननंच सांगितलंय. श्रद्धाच्या फोनवरील वॉलपेपरचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये दिसणारा व्यक्ती अन्य कुणी नसून 34 वर्षांचा चित्रपट लेखक राहुल मोदी (Rahul Mody) आहे.
श्रद्धा काही दिवसांपूर्वी मुंबईत दिसली होती. ती कारमध्ये बसतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओत श्रद्धाच्या मोबाईलचा वॉलपेपर दिसतोय. नेटीझन्सचं त्या वॉलपेपरकडं लक्ष गेलं. त्यानंतर श्रद्धा आणि राहुलच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली आहे.
काही दिवसांपूर्वी दिली होती हिंट
श्रद्धा कपूर किंवा राहुल मोदी दोघांपैकी कुणीही अद्याप त्यांच्या रिलेशनशिपची पृष्टी दिलेली नाही. पण, 37 वर्षांच्या अभिनेत्रीनं काही दिवसांपूर्वी एका इन्स्टाग्राम स्टोरीवरुन तिच्या आणि राहुलच्या रिलेशनशिपबाबत हिंट दिली होती.